Homeघडामोडीहाजगोळी बंधाऱ्यावर पडले भगदाड… वाहतूक रोखली

हाजगोळी बंधाऱ्यावर पडले भगदाड… वाहतूक रोखली

आजरा (हसन तकीलदार ):-आजरा -हाजगोळी बंधाऱ्यांवरील स्लॅबच्या लोखंडी सळ्या दिसत होत्या त्यावेळीच जर दुरुस्ती झाली असती तर आज ही परिस्थिती ओढावली नसती. एक ते दीड महिना उलटून गेला तरीही बंधाऱ्याची दुरुस्ती अथवा डागडुगी झालेली नाही कि याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. बंधाऱ्यांवर मोठा खड्डा पडला असल्यामुळे तेथील वाहतूक तात्पुरती बंद केली असल्याचे समजते.


हिरण्यकेशी नदीवरील हाजगोळी खुर्द बंधाऱ्यावरून हाजगोळी खुर्द, हाजगोळी बुद्रुक, पेद्रेवाडी, कोवाडे, सरोळी, नींगुडगे, ऐनापूर या गावाना मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक तालुक्याच्या ठिकाणी होत असते. 1997साली बांधकाम झालेल्या या बांधाऱ्याला दरवर्षी पुरामध्ये धोका निर्माण होत असतो. बऱ्याचवेळा येथील भराव वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु आजपर्यंत यावर जुजबी आणि मलमपट्टी करण्याचे काम झाले आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप होत आहे. बंधाऱ्यावरून मल्टी एक्सेल ट्रक जे 25ते 30टनापेक्षा जास्त वजनाची माल वाहतूक करतात यावर प्रतिबंध घालणे संबंधित विभागाची जबाबदारी आहे. नाहीतर बंधाऱ्याच्या मूळ पायाला नुकसान पोहचून बंधारा पडण्याची शक्यता आहे असे जाणकारांचे मत आहे. याच बंधाऱ्यावरून प्रवासी वाहने, माल वाहक, एस. टी., इ. ची रोजची येजा सुरु असते. रस्ता अरुंद व कमी उंचीचा असल्यामुळे येथून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. यासाठी या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस संरक्षक रोलिंग बसवून उंची वाढवणे गरजेचे आहे असे डॉ. रोहन जाधव यांनी आपले मत मांडताना सांगितले. तसेच भगदाड मुजवून तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा याठिकाणी कायमस्वरूपी उपाय योजना आखाव्यात असेही यावेळी त्यांनी सांगितले.

🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचं व्यासपीठ – Link Marathi

🌿 तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.

🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!

🎙️ Follow Us 🎙️

*You Tube चॅनेल लिंक* 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=9fVf1D0sqOPFWHQS

*व्हाट्सअँप चॅनेल लिंक*👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular