टेकऑफनंतर आगीचा गोळा!
ब्रिटनमध्ये छोटं प्रवासी विमान कोसळलं – जीवितहानीबाबत अद्याप अनिश्चितता!
लंडन – :
ब्रिटनच्या साउथेंड एअरपोर्टवरून उड्डाण घेताच काही क्षणांतच बीचक्राफ्ट बी200 हे छोटं प्रवासी विमान आगीत जळून खाक झालं. हे विमान नेदरलँड्सच्या लेलीस्टॅडकडे निघालं होतं. टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि पायलटचे नियंत्रण सुटल्याने विमान धावपट्टीजवळच कोसळलं.

🔥 प्रत्यक्षदर्श्यांनी सांगितले की, विमान हवेतच आगीचा गोळा झालं होतं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत विमानातून धूर व ज्वाळा बाहेर येताना दिसत आहेत.
🚒 एसेक्स पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. विमानात किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
🛑 विमानतळ प्रशासनानं धावपट्टी तात्पुरती बंद केली असून सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.
➡️ एसेक्स पोलीस अधिकृत निवेदनात म्हणाले :
“विमान कोसळल्यानंतर आग विझवण्याचे आणि जिवितहानी टाळण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचं कारण शोधण्यासाठी तपास सुरु आहे. तांत्रिक बिघाड किंवा इंजिन फेल्युअर शक्य कारणांमध्ये आहेत.”
🗞️ पुढील अपडेटसाठी – ‘लिंक मराठी’ बघत राहा!
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
व्हाट्सअप ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

मुख्यसंपादक


