आजरा (प्रतिनिधी):
आजरा तालुक्यातील निंगुडगे गावात एका बंद घरातून तब्बल साडेदहा लाखांचे सोने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एक महिला व एका अल्पवयीन मुलासह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे.
⏺️ नेमकं काय घडलं?
निंगुडगे येथील संभाजी श्रीपती भोसले हे व्यवसायानिमित्त गोव्यातील मोरजी येथे वास्तव्यास आहेत. महिनाभरापूर्वी भाऊ आजारी पडल्याने आईला गावच्या घरात ठेवून ते मुंबईत उपचारासाठी गेले होते. जाताना घरातील बेडरूममधील तिजोरीत त्यांनी लक्ष्मी हार, चेन, ब्रेसलेट आणि इतर सोन्याचे दागिने ठेवले होते.

१३ जुलै रोजी ते पुन्हा गावी परतले असता, तिजोरीतील सव्वादहा लाखांचे सोनं गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याबाबत त्यांनी तात्काळ आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
⏺️ चौकशीत महत्त्वाचा धागा सापडला
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेसह चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

⏺️ तपासाची दिशा ठरतेय
ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडून चोरीबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असून, या प्रकरणाचा उलगडा लवकरच होण्याची चिन्हं आहेत. पुढील तपास आजरा पोलीस करत आहेत.
👉 या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, बंद घरे किती असुरक्षित आहेत हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
📌 अधिकृत बातम्यांसाठी – लिंक मराठीवर रहा अपडेट!
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
व्हाट्सअप ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

मुख्यसंपादक



