Homeघडामोडीमाणुसकीचा झरा.. युवकांनी "त्या "रुग्णाला दिला मदतीचा हात

माणुसकीचा झरा.. युवकांनी “त्या “रुग्णाला दिला मदतीचा हात

आपली मदत आणि देणगी योग्य ठिकाणी देणे गरजेचे- रेहान तकीलदार(शिवसेना उबाठा वॉर्ड प्रमुख)
आजरा (हसन तकीलदार ):-हुक्केरी तालुक्यातील मैसूरगप्पी गावातील 27वर्षीय तरुणी ब्रेनट्यूमरने ग्रस्त आहे. तिच्या वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. ती मदत गोळा करण्यासाठी आजऱ्यात आलेल्या तिच्या वडिलांचे हृदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू झाले होते. त्यामुळे दर्गागल्लीतील काही युवकांनी पुढाकार घेत स्वतः आर्थिक मदत गोळा करून तिच्या गावी जाऊन ती मदत त्यांच्या घरात देऊन आले.


सविस्तर मिळालेली माहिती अशी की,हुक्केरी तालुक्यातील मैसूरगुप्पी गावचे जहांगीर इनामदार यांच्या 27वर्षीय मुलीला ब्रेनट्यूमर सारख्या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे या मुलीला दवाखान्यात दाखल करून जहांगीर इनामदार आजऱ्यामध्ये आर्थिक मदत गोळा करण्यासाठी मागच्या आठवड्यात आले होते. दर्गागल्लीतील मस्जिद मध्ये मदत गोळा करून जाताना गल्लीत रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यु झाला होता. त्यावेळी तेथील युवाकांनी माहिती घेऊन कोवाड मधील असणाऱ्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
त्यानंतर दर्गागल्लीतील काही युवक पुढे येत त्यांच्यासाठी आर्थिक मदत गोळा केली आणि मैसूरगुप्पी येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांच्या ती मदत स्वाधीन केली. अत्यंत बिकट आणि गरिबीत असणाऱ्या आणि सर्व जमापुंजी दवाखान्यात खर्च केलेल्या त्या कुटुंबाला आर्थिक गरज होती. हे त्यांच्या घरात गेल्यानंतर कळले. यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रेहान तकीलदार म्हणाले की, समाजातून मोठ्या प्रमाणात सदका फितराची रक्कम मदत म्हणून गोळा केली जाते. परंतु ही रक्कम योग्य ठिकाणी व योग्य माणसांच्या हाती जात नसल्याने आज समाजात असे प्रसंग उद्भवत आहेत. यासाठी समाजाने एकत्रित येत अशा गोष्टीवर निर्बंध आणून जे याचा व्यवसाय मांडला आहेत त्यांच्यावर अंकुश आणले पाहिजे. जे याचा गैरफायदा घेवून आपल्या स्थावर मालमत्ता आणि संपत्या वाढवत आहेत, लोकांची फसवणूक करीत आहेत यांना या देणग्या न देता गोरगरीब आणि गरजूना ही सदका आणि फितरा ची रक्कम दिली तर कोणताही गरीब शिक्षण, मुलींची लग्ने, आजारपण, दवाखाना यासाठी वणवण फिरणार नाही. त्यामुळे समाजाने योग्य ठिकाणी आपला पैसा द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


यावेळी रेहान बशीर तकीलदार (शिवसेना उबाठा वॉर्ड प्रमुख ), नौशादभाई बुडडेखान (सामाजिक कार्यकर्ते ),बबलू तकीलदार, बैजू शकील तकीलदार,बाबाजान तकीलदार, अशपाक तकीलदार, अर्शद बुडडेखान, सद्दाम तकीलदार, शम्स तकीलदार, आरिफ लतीफ सर, असिफ तगारे, आतिफ तकीलदार, अबू मालदार आदिजणांनी यात सहभाग नोंदवला.तकीलदार वेलफेअर ट्रस्ट यासाठी भरीव कार्य सुरु करीत आहे असे यावेळी स्पष्ट करण्यात आले

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

📺 यूट्यूब चॅनेल: 👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk

📘 फेसबुक पेज:👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🌐 वेबसाईट:

www.linkmarathi.com

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular