आजरा (हसन तकीलदार):
आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवर असलेले शेळप, दाभील, साळगाव आणि हाजगोळी गावांदरम्यानचे रस्ते हे कोल्हापूर पद्धतीने बांधलेल्या (KT) बंधाऱ्यांवरून जातात. पावसाळ्यात बंधाऱ्यांवर पाणी आल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. अनेकदा नागरिकांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागते. ही गंभीर समस्या लक्षात घेता बंधाऱ्यांना समांतर पूल बांधावेत अशी मागणी शिवसेना (उबाठा) तर्फे करण्यात आली असून आजरा तहसीलदार समीर माने यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १९९७च्या सुमारास बांधलेले हे बंधारे सध्या खूपच जुने व कमकुवत झाले आहेत. यावरून एस.टी., ट्रॅक्टर, ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने नेहमीच ये-जा करीत असतात. परिणामी बंधाऱ्यांची रचना खचत चालली आहे. तसेच रस्त्यावर खड्डे पडलेले असून, बंधाऱ्यांना दोन्ही बाजूंनी संरक्षक कठडेही नाहीत, हे धोकादायक ठरत आहे.
यावर्षीच्या पुरामुळे या बंधाऱ्यांवर दिवसांनुदिवस पाणी साचले होते, त्यामुळे वाहतूक बंद ठेवावी लागली होती. हाजगोळी बंधाऱ्यावर पूर्वी भगदाड पडल्याची घटना घडली असून, त्यावेळी केवळ तात्पुरती मुरमाची मलमपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी समांतर पूल बांधणे गरजेचे आहे, अशी या निवेदनातील ठाम मागणी आहे.

या निवेदनावर खालील शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत:
संभाजी पाटील (उपजिल्हा प्रमुख), युवराज पोवार (तालुकाप्रमुख), ओंकार मद्याळकर (शहर प्रमुख), संजय येसादे (तालुका संघटक), अमित गुरव, सुयश पाटील, अनिल सुतार, विजय डोंगरे, संजय सावंत (देऊळवाडी), महादेव गुरव, सदानंद कदम आदींचा समावेश आहे.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



