Homeघडामोडी२१ जुलैला मुंबईत देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा एल्गार ; आजरा-गडहिंग्लज सह कोल्हापूर...

२१ जुलैला मुंबईत देवस्थान इनाम जमीनधारक शेतकऱ्यांचा एल्गार ; आजरा-गडहिंग्लज सह कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा सहभाग

अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र आणि अखिल भारतीय गुरव समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जुलै २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे देवस्थान इनाम जमीनधारक शेतकरी व देवस्थान पुजाऱ्यांचा भव्य मोर्चा व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतून हजारो शेतकरी मुंबईकडे रवाना होत असून, कोल्हापूर जिल्ह्यासह आजरा, गडहिंग्लज, चंदगड आणि गारगोटी परिसरातील शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.


“देवस्थान इनाम खालसा झालंच पाहिजे” आणि “संबंधित कायद्याची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे” या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होत असून, सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यावेळी कॉ. शिवाजी गुरव यांनी सर्व देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular