आजरा (हसन तकीलदार ):-संकेश्वर -बांदा महामार्गावरील आजरा एम. आय. डी. सी. जवळील टोलनाक्यामुळे आजरावासियांना नाहक टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार असलेने हा टोलनाका तालुक्याच्या टोकाला हलवा किंवा आजरेवासियांना टोलमधून मुक्ती द्या अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना आजरा सरपंच परिषदेने दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर- बांदा या राष्ट्रीय महामार्गावर आजरा औद्योगिक वासाहती जवळ टोल वसुलीसाठी टोलनाका बसवणेत आला आहे. आजरा तालुक्याच्या भौगोलिक विस्तार आणि अशातच मध्यवर्ती ठिकाणी बांधणेत आलेला टोलवसुली नाका यामुळे आजरेकरांना नाहक टोल भरावा लागणार आहे. नागरिकांना टोलमाफी व्हावी यासाठी आजऱ्यातील सर्वपक्षीय मंडळींनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरु ठेवले आहे. यावर तोडगा निघण्यापूर्वीच टोल वसुलीच्या हालचाली सुरु होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदरच्या टोल वसुली नाक्याची जागा चुकीची निवडलेली असलेने आजरेवासियांना याचा नाहक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे सदर टोलची जागा बदलणेची गरज आहे. कायम स्वरूपी टोलपासून आजरेकरांना मुक्त करावयाचे असलेस टोल नाक्याची जागा घाटकरवाडी या गावाच्या पुढील बाजूस करणे योग्य होईल जर जागा बदलणे अशक्य झालेस आजरेवासियांना टोलमाफिबाबतचे स्वतंत्र कार्ड वाहनधारकांच्या मागणीनुसार देणेत यावीत अशी मागणी या निवेदनातून आजरा सरपंच परिषदेने केली आहे.

या निवेदनाच्या प्रती अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा, वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन मुंबई यांनाही देण्यात आल्या आहेत.

निवेदनावर जी. एम. पाटील, पांडुरंग तोरगल्ले, प्रियांका जाधव, युवराज पाटील, समीक्षा देसाई विलास जोशीलकर, राजू पोतनीस, रत्नप्रभा भुतुर्ले, धनाजी दळवी, अनिल पाटील, लहू वास्कर, पांडुरंग खवरे, वैषाली गुरव, मारुती बुरुड, बंडू पाटील, संजय सावंत (देऊळवाडी ), शिवाजी पाटील आदींच्या सह्या आहेत.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



