आजरा (हसन तकीलदार):-शहीद अब्दुल हमीद विकास सेवा संस्था मर्या. सावरवाडी या संस्थेची सन 2025 ते 2030 या कालावधिकारिता संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकातून चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांची निवड करण्यात आली. चेअरमनपदी अबूताहेर अल्लाउद्दीन तकीलदार तर व्हा. चेअरमन पदी इब्राहिम युसूफ नसरदी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
शहीद अब्दुल हमीद विकास सेवा सोसायटी मर्या. सावरवाडी या संस्थेच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवड करताना संस्थेच्या चेअरमन पदासाठी अबूताहेर तकीलदार यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाले व छाननी अंती वैध असलेने त्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. यावेळी युसूफ अब्दुल भडगावकर यांनी नाव सुचविले तर बाबू इब्राहिम लतीफ यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदी इब्राहिम युसूफ नसरदी यांचे नाव बशीरअहमद नजबुद्दीन लतीफ यांनी नाव सुचविले तर यास प्रकाश दादू कांबळे यांनी अनुमोदन दिले. ही निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी जे. एन. बंडगर यांचे अध्यक्षतेखाली संस्था कार्यालय येथे पार पडली. यावेळी अबूताहेर तकीलदार म्हणाले की, संस्थेचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्याने संस्था फायद्यात आणणे अवघड होत आहे.
सभासदांना लाभांश देता येत नाही. दरवर्षी शंभर टक्के वसुली असून एक आदर्श संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. पदरमोड करून संस्था चालवली जात आहे. यासाठी संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवून सभासदांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याकडे आम्ही सर्वजण लक्ष केंद्रित करणार आणि संस्थेच्या हितासाठी निःस्वार्थपणे काम करणार. माझे सभासद सहकारी झाकीर आगलावे यांचे सहकार्य वेळोवेळी लाभत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बशीर तकीलदार, युसूफ भडगावकर, युसूफ खेडेकर, कुदरत लतीफ, नियाज तकीलदार, बाबू लतीफ, श्रीमती.रजिया इस्माईल तकीलदार,सौ. शिंगटे, प्रकाश कांबळे, बशीर लतीफ, कैयुम बुडडेखान, आशपाक तकीलदार, साबीर तकीलदार, रेहान तकीलदार,रजनीकांत कुंभार (सचिव) आदिजण उपस्थित होते. शेवटी इब्राहिम नसरदी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



