Homeघडामोडीवन्यप्राणी समस्या निवारण बाबत "एक लाख सह्यांचे "निवेदन देणार -बहुजन मुक्ती पार्टी

वन्यप्राणी समस्या निवारण बाबत “एक लाख सह्यांचे “निवेदन देणार -बहुजन मुक्ती पार्टी

आजरा (हसन तकीलदार):-विकासाच्या नावावर महामार्गाचे जाळे तयार करताना होणारी वारेमाप जंगलतोड यामुळे रानटी जनावरे शेताबरोबरच शेतकऱ्यांच्या घरापर्यंत येत आहेत. त्याचप्रमाणे जंगलातून रस्त्यांचे जाळे पसरल्यामुळे वाहन चालकांना जंगली जनावरांनी मारलेस नुकसान भरपाई मिळत नाही. या सर्व बाबींसाठी मागील काही महिन्यापासून वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी टप्प्याटप्प्याने आंदोलने करीत आहे. यातीलच एक भाग म्हणून”एक लाख सह्यांचे”निवेदन बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाधिकारी, जिल्हावनसंरक्षक, वनमंत्री आणि पालक मंत्री यांना देणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितले.


वन्य प्राण्यांच्या समस्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.कधी निसर्ग मारतो तर निसर्गाच्या चक्रातून वाचल्यास जंगली प्राणी नुकसान करतो. गरज नसलेल्या वेगवेगळ्या महामार्गांच्या निर्मितीमुळे जंगलसंपदा नष्ट होऊन निसर्गाला हानी पोहचत आहे. यावर निसर्ग प्रेमी मात्र मूग गिळून गप्प आहेत. जंगलांचे संवर्धन झाले नसल्यामुळे जंगली जनावरे शेतात आणि शेतातून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचले आहेत. यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने शृंखलाबद्ध आंदोलने सुरु केलेली आहेत. दि. 3फेब्रुवारी 2025 ला पत्रव्यवहार, त्यानंतर पुन्हा 16मे 2025रोजी पत्रव्यवहार, दि. 30मे 2025सहाय्यक वनसंरक्षक यांनी केलेले पत्रव्यवहार, दि. 26जून 2025रोजी सहाय्यक वनसंरक्षक यांच्यासोबत बैठक होऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. आणि 1जुलै 2025 रोजी यासाठी आजरा बंदची हाक देण्यात आली होती. तरीसुद्धा यावर अजून शासनाने ठोस पावले उचललेली नाहीत त्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी एक लाख सह्यांचे निवेदन देणार आहे. यासाठी लागणाऱ्या कागदांच्या पूर्ततेसाठी आवाहन करण्यात आले होते त्यानुसार काही दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत ए फोर साईजच्या कागदांची रिम्स देणगी स्वरूपात दिलेल्या आहेत. बहुजन मुक्ती पार्टी संविधानिक मार्गाने लढा देत असून सर्व लढे टप्प्याटप्प्याने पूर्ण करीत प्रश्न मार्गी लावत आहे. वन्य प्राण्यांचा प्रश्नही इतर प्रश्नाप्रमाणे यशस्वीपणे सुटतील असा विश्वास बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी अशाच पद्धतीने बहुजन मुक्ती पार्टीला साथ व सहयोग देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर, राहुल मोरे, अमित सुळेकर, तुकाराम कांबळे, ऍड. विद्या त्रिरत्ने, शरद कुंभार, नितीन राऊत, दशरथ सोनुले, अवधूत सुतार, प्रकाश कांबळे, रवी देसाई, महादेव कांबळे, सुरेश दिवेकर आदिजण उपस्थित होते.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular