Homeघडामोडी१५ सप्टेंबर रोजी देवस्थान जमीनधारकासाठी किसान सभेच्या वतीने आजरा तहसीलवर निदर्शने

१५ सप्टेंबर रोजी देवस्थान जमीनधारकासाठी किसान सभेच्या वतीने आजरा तहसीलवर निदर्शने

आजरा (हसन तकीलदार):-सोमवार दि.१५ सप्टेंबर रोजी देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांची आखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात आजरा तहसिलदार कार्यालयासमोर निदर्शने करून आजरा तहसिलदार यांना निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तालुक्यातील देवस्थान जमीन धारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्या बाबत सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. सदर आंदोलनात तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीन धारक शेतकरी तसेच इतर खाजगी ट्रस्टशी संबंधित सर्व देवस्थान शेतकरी सहभागी होणार आहेत. सरसकट सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा आणि देवस्थान शेतकऱ्यांचे पीक पाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी-3.00 वा. निदर्शने आजरा तहसिलदार कार्यालयासमोर होणार असून यावेळी तहसिलदार यांना निवेदनही देण्यात येणार असल्याचे कॉ. शिवाजी गुरव यांनी सांगितले.
देवस्थान शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य व न्याय निर्णय व्हावा.ही अखिल भारतीय किसान सभेची आग्रही भूमिका आहे.अन्यथा या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक व बेमुदत आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.असा इशारा देण्यासाठी व मागण्यांची अंमलबजावणी होण्यासाठी हे निदर्शन करण्यात येणार आहे.


ही निदर्शने संविधानिक मार्गाने मुद्द्यांची व मागण्यांची अंमलबजावणी होण्यासाठी करणार आहोत.याला सर्वांनी सहकार्य व पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

यावेळी कॉ.संग्राम सावंत, ऍड.दशरथ दळवी, कॉ.शिवाजी गुरव,हणमंत गुरव,शिवाजी गिलबिले,संजय गुरव,जानबा धडाम, काशिनाथ तेली आदिजण उपस्थित होते.

“ताज्या मराठी घडामोडी आणि नानाविध व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच Link Marathi चॅनेल Subscribe आणि Follow करा!” 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular