मुंबई ( प्रतिनिधी ) -: चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेले उद्योजक खोराटे यांनी रविवारी १ सप्टेंबर रोजी मुंबई येथील श्रमिक जिमखाना मैदान , लोअर परेल याठिकाणी जनसंवाद मेळावा आयोजित केला होता. यानिमित्ताने त्यांनी स्थानिक पण नोकरी निमित्त तिथे असलेल्या लोकांशी संवाद साधला. त्यावेळी झालेली गर्दीतून विरोधकांना धक्के देण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत रिंगण सोडणार नसल्याचे अप्रत्यक्ष दाखवून देत आहेत अशी चर्चा रंगताना दिसते.
मी प्रयत्नाची मला पराकष्टता करून आणि खडतर प्रवासातून उत्कृष्ठ उद्योजकता कशी मिळवली याबाबत चे अनुभव सांगितले. तसेच याच अनुभवाच्या बळावर दहा वर्ष बंद असलेला कारखाना चालवून त्याला सोन्याचे दिवस आणतो आहे त्याचप्रमाणे अथर्व दौलत कारखान्याच्या माध्यमातून रोजगार मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पूरग्रस्तांना मदत , असे विविध उपक्रम राबवित सामाजिक भान जपले आहे. चंदगड च्या शाश्वत विकासाला चालना मिळण्यासाठी 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे नमूद करून उपस्थित त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रस्तावना राजेंद्र निकम यांनी केली . ॲड.संतोष मळवीकर, ॲड.चंद्रकांत निकम, वर्षा केसरकर, सरोजनी खोराटे, सुरेश दिनकर आपके – मंडळ अध्यक्ष, लक्ष्मण मोरे, ॲड.नामदेव जाधव, दीपक येसादे , त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा ग्रामस्थ प्रतिष्ठान मुंबईचे बाजीराव देवरकर, सुशांत मुरकुटे, संदीप रेडेकर , सतीश पाटील, प्रवीण पावले , कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ मुंबई येथील रत्नाकर देसाई,आकाश सावंत, अक्षय देसाई ,राज देसाई, नामदेव हेळवाडकर, कोल्हापूर जिल्हा महिला मंडळ मुंबई येथील चेतना सावंत ,श्रुती पाटील ,सुषमा निकम, हालेवाडी ग्रामविकास मंडळाचे अविनाश आपके, सतीश आपके, विजय तानवडे, दीपक येसादे, विलास येजरे व चंदगड-आजरा-गडहिंग्लज मुंबई येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . सूत्रसंचालन संग्राम आपके यांनी केले व आभार विजय तानवडे यांनी मांडले.
मुख्यसंपादक