आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीची निवडणूक जवळ येईल तशी भावी नगरसेवकांची भाऊ गर्दी वाढतच चाललीय. सोशल मीडियावर प्रत्येक इच्छुक आपल्या वॉर्डात मीच अशा आशयाची स्टेट्स आणि वॉट्सअपला प्रचार प्रसार सुरु केला आहे आणि आघाडीमध्ये आपलं स्थान पक्के करण्यासाठी धडपड सुरु केली आहे. परंतु तालुक्याला लाभलेल्या दोन्ही नामदारांनी मात्र अजूनही मौन पाळलेले दिसते. दोन्ही नामदारांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात असल्याने कार्यकर्त्यांची मात्र तडफड सुरु आहे. साहेबांनी अमुक यांच्या पाठीशी राहण्यासाठी सांगितले आहे, अमुक गटाशी युती करणार अशा अफवाना मात्र उधाण आलेले दिसत आहे. यात दोन्ही आघाड्या मात्र सावधगिरी बाळगत उमेदवार निवडीसाठी चाचपणी करीत आहेत.

आजरा नगरपंचायतीच्या निवडणू्कीमध्ये विचित्र आघाड्या होण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारिंचा नागराध्यक्ष पदाचा उमेदवार जवळ जवळ निश्चित झालेला दिसत आहे. परंतु विरोधी आघाडीमध्ये अनेकजण एकत्र आल्यामुळे निवड करताना अडचणी येताना दिसत आहेत. निष्कलंक, युवा व राजकारणातील अनुभवी नेतृत्व, सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबरीने घेऊन जाणारा त्याचप्रमाणे आलेल्या निधीचा सदुपयोग करणारा. निधीचा विकासासाठी वापर करणारा, विकासासाठी योग्य पावले उचलणारा उमेदवार असावा असा उमेदवार शोधला जात आहे. जवळ जवळ चार नावे आघाडीवर असताना त्यातील आता दोन नावे पुढे आलेली असल्याचे बोलले जात आहे. त्यातून वरील बाबींचा ज्यामध्ये स्पर्श आहे अशा उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल असा अंदाज आहे. या अगोदर लिंक मराठी चॅनेलने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे विरोधी आघाडीत घडामोडी घडत असल्याबद्दल बोलले जात आहे . यातच गेल्या विधानसभेला नाम. आबिटकर यांना ज्या मुस्लिम मावळ्यांनी मोलाची साथ दिली होती आता त्या मुस्लिम मावळ्यांना वरून काय आदेश होणार याचाही परिणाम नगरपंचायत निवडणुकीत दिसणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी कोणाला मदत करणार हे ही महत्वाचे ठरणार आहे कारण ही निवडणूक अटीतटीची राहणार आहे. किती उमेदवार रिंगणात उतरणार आहेत याचेही गणित महत्वाचे आहे त्यासाठी अजून चित्र स्पष्ट व्हायचे आहे.
“रणसंग्राम आजऱ्याचा सुरू झाला आहे…
तुमच्या गावाचा, तुमच्या भवितव्याचा आणि तुमच्या आवाजाचा हा निर्णायक क्षण!
घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि सत्य माहिती मिळवण्यासाठी—
आत्ताच ‘Link Marathi’ YouTube चॅनेल Subscribe करा.
रणभूमीवरचा प्रत्येक अपडेट सर्वात आधी… फक्त इथे!”
युट्युब लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH
व्हाट्सअप लिंक 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
बातम्या देण्यासाठी संपर्क साधा – अमित गुरव , हसन तकिलदार
8421666667

मुख्यसंपादक



