इच्छा आकांक्षा आमच्या आम्ही का बांधून घ्यायच्या,
कठपूतलीसारखं का तुमच्या तालावर नाचायचं…?
उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं…?
का नाही आम्ही आमची मतं मांडायची ?
डोक्यावर सतत टांगती तलवार ठेवायची…!
सवयच करून घेतली आता हुकून गाजवायची…!
वेळ आली आहे आता पेटून उठायची…!
आम्हीही काही कमी नाही, हे दाखवून देण्याची…!
स्वतःच्याच ध्येयासाठी काहीतरी करून दाखवण्याची…..!
या आपण सर्वांनी एकमेकां सावरूया…!
घासातला घास इतरांनाही भरवूया…!
जखडून ठेवलेली ही कठपुतलीची दोरी उखडून फेकूया…!
लेखक –
– विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
मुख्यसंपादक
खरंय