भारताच्या राज्यघटनेनुसार भारतीय नागरिकांनी भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्थापण्याचे घोषित केले आहे हा उद्देश साध्य करण्यासाठी राज्य घटनेने कार्यकारी मंडळ विधिमंडळ व न्यायमंडळ या संस्थात्मक सरचेनेची निर्मिती केली आहे. काळाच्या ओघामधये या संघराज्य व्यवस्थेमध्ये व त्याच्या विविध संस्थांमध्ये तसेच नागरिकांच्या सहभागातही उदासीनता आल्याचे सकृत दर्शनी दिसून येते. आज मितीस म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतरच्या सहाव्या दशकातही नागरिकांचा राज्य कारभारामधये मतदानापलिकडे फारसा सक्रिया सहभाग दिसून येत नाही.
जर आपणांस विशिष्ट माहिती प्राप्त करावयाची असेल तर आपणं संबंधित माहिती अधिकार याकडे अर्ज केला जातो. आपण जर आडवळणी गावांत रहात असाल तर आपला अर्ज त्या विभागाच्या व त्या खात्याच्या माहिती अधिकार याकडे सादर करावा लागतो हा माहिती अधिकारी तुमच्या अर्जावर ३० दिवसांत कार्यवाही करणे बंधनकारक आहे . या अधिनियमात जरी नमुना अर्जाचे बंधन घालण्यात आले नसले तरी सोईकरिता म्हणून अर्जाचा नमुना पुढे दिला आहे. त्यासोबत रुपये १०/ रोखीने अथवा बॅंकेच्या मार्फत अथवा चेक डिमांड ड्राफ्ट. अथवा कोर्ट फी स्टॅम्प लावून भरायची आहे.
आपण वरील प्रमाणे सर्व माहिती मिळविण्यासाठी अर्ज दाखल करत असतो पण जन माहिती अधिकारी माहिती देण्यासाठी विविध माध्यमातून माहिती अधिकार दाखल करणार्या व्यक्तिला विविध न पटणारी कारणें सांगून त्यांना नाहक त्रास देत असतात
कारणे कोणती-:
(१) विनाकारण
(२) उपलब्ध नाही म्हणून
(३) माहिती संदिग्धत स्वरूपाची मागितली म्हणून
(४) माहिती शुल्क कळवूनही भरणा केला नाही म्हणून
(५) माहिती व्यापक स्वरुपाची मागितली म्हणून
(६) माहिती दिर्घकाळाची मागितली म्हणून
(७) जण अधिकारी यांची नियुक्ती नाही म्हणून
(८) पूर्व अधिकारी यांचेकडून माहिती प्रकरणं प्रभारात मिळाले नाही म्हणून
(९) त्रेयसत पक्षांची म्हणून
(१०) इतर प्राधिकरणाकडील माहितीची मागणी म्हणून
(११) संबंधितांनी सहाय्य केले नाही म्हणून
(१२) संबंधितांचे सहाय्य घेतलें म्हणून
(१३) मागितलेली माहिती तयार झाली नाही म्हणून
(१४) मागितलेली माहिती उपलब्ध नाही म्हणून
(१५) माहितीचा जतन कालावधी संपलेला आहे म्हणून
(१६) मागितलेली माहिती हरवली म्हणून
(१७) मागितलेली माहिती नष्ट झाली म्हणून
(१८) मागितलेली माहिती घेण्यास अपिल करणारे नाकारली म्हणून
(१९) तक्रार अर्ज निकाली काढला नाही म्हणून
(२०) माहिती अधिकार अर्ज सदोषपणे असंबध प्राधिकरणाकडे पाठविला म्हणून
(२१) माहिती अधिकार अर्ज डाकेतून प्राप्त झाला नाही म्हणून
(२२) माहिती अधिकार अर्ज सर्व प्रकारे आढळ होत नाही म्हणून
(२३) माहितीचा अधिकार अर्ज इतर निकाली काढला नाही म्हणून
(२४) माहिती एका पेक्षा जास्त विषयांची मागितली म्हणून
(२५) माहिती कार्यालयीन कारवाई करून मागितली म्हणून
(२६) अर्जदाराने प्रथम अपिल अर्ज केला म्हणून
(२७) अपिल करणाऱ्यांचे समाधान झाले म्हणून
(२८) अपिल करणार्या ची माहिती बाबत गरज उरली नाही म्हणून
(२९) माहिती अधिकारी दिर्घ काळ रजेवर होते म्हणून
(३०) माहिती अधिकारी निलंबित होतें म्हणून
(३१) मागितलेल्या माहीतीचे अभिलेख पूर्व अधिकारी यांनी प्रभारात दिले नाही म्हणून
(३२) इतर महत्वाची कामे हाती होती म्हणून
(३३) निवडणूक. नैसर्गिक आपत्ती रोगराई मुळे व्यस्त होतो म्हणून
(३४) बदली झाली म्हणून
(३५) माहिती अधिकार दाखल करणार्या व्यक्तिची माहिती कलम २( ज ) या माहितीच्या व्याख्येत बसत नाही म्हणून
(३६) आपला माहिती अधिकार अर्ज दिडसे शब्दापेक्षा जास्त आहे म्हणून
(३७) एका वेळी एकच विभागांची माहिती नाही म्हणून
(३८) विविध विभाग. विविध विषयांची माहिती मागितली म्हणून
(३९) माहिती प्रश्नार्थक स्वरूपात मागितली म्हणून देत येत नाही
(४०) आपण मागितलेली माहिती विस्तृत स्वरुपाची व खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्य बळ वळवावे लागणार असल्याने देता येत नाहीं
(४१) माहिती तृतीय पक्षासी संबंधित असल्याने वैयक्तिक असल्याने. देता येणार नाही
(४२) कलम ८ नुसार माहिती नाकारण्यात येत आहे
(४३) आपल्या माहिती अधिकार अर्जातील माहीतीचा अर्थ बोध होत नाही
(४४) माहितीचा अधिकार अर्ज स्विकारण्यास व ओ सी. वर शिक्का मारून देण्यास नकार देणे
(४५) अर्ज केल्यावर ३० दिवस उलटून गेले तरी कसलीही माहिती वा प्रतिसाद न देणें
नमस्कार मित्रांनो जनमाहिती अधिकारी माहिती देणे नाकारतात त्याची तुम्हाला अनुभवला आलेली वरील व्यतिरिक्त अन्य कारणे प्रतिक्रिया लिहताना मांडा
जनमाहिती अधिकारी यांचे असे माहिती नाकारण्याचे बहाणे आपण प्रथम अपिल मध्ये अभ्यासपूर्ण व कायद्यातील तरतुदी कलम व्यवस्थित रित्या सप्रमाण व नेमकेपणाने तोडी किंवा लेखी स्वरूपात मांडून खोडून काढल्या पाहिजेत
अहमद नबीलाल मुंडे
– बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
– रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
– रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
– मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
– माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
– संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
मुख्यसंपादक
खूप उपयोगी माहिती , धन्यवाद