Homeक्राईमकोणत्या गुन्ह्यात कलम ( IPC ) आधारे काय शिक्षा होऊ शकते..

कोणत्या गुन्ह्यात कलम ( IPC ) आधारे काय शिक्षा होऊ शकते..

       आपल्यातील व आपल्या समाजातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या वागण्यामुळे समाज मलिन होतो. त्यावेळी समाजात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय दंड संहिता विशोधन विविध कायदे कलम तयार करण्यात आले आहेत. बालकामगार कायदे,  खून , मारामाऱ्या,  अपहरण , खंडणी, महिला सुरक्षा,  दरोडा,  चोरी, त्यातील प्रमुख दंड कलम बलात्काराविषयी कायदे. विवाहित संबधी कायदा. शारीरिक गंभीर गुन्हे  सर्वसामान्य जनता गोरगरीब यांच्या हितासाठी तयार करण्यात आले आहेत. 

दुखापत / मारहाणीबाबत अपराध
(१) भा दं वि ३२३
हाताने /ठोशाने /इच्छा पूर्वक साधी दुखापत
शिक्षा. १ वर्ष कारावास किंवा १ हजार रुपये दंड अथवा दोन्ही क्रियाकरीता. /अदखलपात्र
न्यायालय- कोणतेही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३२४
हत्यार / साधनांचे माराहाण इच्छा पूर्वक साधी दुखापत.
शिक्षा ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही
क्रियाकरीता – दखलपात्र अजामीनपात्र
न्यायालय.- कोणतेही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३२५
हाताने/ व ठोशाने/ बुक्कीने माराहाण / इच्छा पूर्वक साधी दुखापत / गंभीर दुखापत
दुखापतीचे प्रकार
(१) पुरुषत्व भंग / डोळयास इजा / कानास इजा / कोणतेही अवयव किंवा सांधा मोडणे /तुटणे / कोणताही अवयव किंवा सांधा कायमचा निकामी होणे /मस्तक किंवा चेहरा कायमचा विद्रुप होणे / हाड किंवा दात मोडणे /ज्या दुखापतीमुळे जीवीतास धोका येतो, वीस दिवसांपर्यंत कायमचे काम करू शकत नाही .
शिक्षा. सात वर्षांपर्यंत व दंड
क्रियाकरीता. दखलपात्र जामीनपात्र
न्यायालय- प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी

भा दं वि कलम ३२६
हत्यार / साधनांचे माराहाण / इच्छा पूर्वक साधी दुखापत /पुरुषत्व भंग / डोळयास इजा /कानास इजा / कोणतेही अवयव किंवा सांधा मोडणे तुटणे / मस्तक किंवा चेहरा कायमचा विद्रुप होणे /हाड किंवा दात मोडणे / ज्या दुखापतीमुळे जीवीतास धोका निर्माण झाला अथवा वीस दिवसांपर्यंत कायमचे काम करू शकत नाही .
शिक्षा. आजन्म कारावास किंवा दंड दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
कार्यपद्धती – दखलपात्र व अजामीनपात्र .
न्यायालय- प्रथमवर्ग दंडाधिकारी

भा दं वि कलम ३२६
दुखापतीचे प्रकार
अॅसिड हल्ले
शिक्षा. १० वर्षांपेक्षा जास्त ते आजन्म कारावासाची शिक्षा व दंड अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायालय

भा दं वि कलम ३२६
दुखापतीचे प्रकार
अॅसिड हल्ले प्रयत्न
शिक्षा. ५ वर्षांपेक्षा जास्त ते ७ वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती- दखलपात्र अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायालय

भा दं वि कलम १८६ (अटकाव )
कर्तव्यात अटकाव करणे / बोलाचाली करणे /दमदाटी करणे
शिक्षा. ३ महिन्यापर्यंत कारावास किंवा पाचशे रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही.
कार्यपद्धती. अदखलपात्र
न्यायालय- कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३५३( धाकाने परावृत्त करणे )
कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करणे, अंगावर धावून जाणे , बलप्रयोग करणे.
शिक्षा. पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही.
कार्यपद्धती. दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायालय

भा दं वि कलम ३३२( इच्छा पूर्वक साधी दुखापत )
कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हाताने , ठोशाने , बुक्क्यांनी माराहाण करने .
शिक्षा. पाच वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडद्रव्य किंवा दोन्ही
कार्यपद्धती. दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय – सत्र न्यायालय

भा दं वि कलम ३३३ ( इच्छा पूर्वक गंभीर दुखापत )
कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी हत्यार, साधनाने माराहाण.
शिक्षा. दहा वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही
कार्यपद्धती. दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायालय

भा दं वि कलम ३०७ ( खुनाचा प्रयत्न )
एखाद्याचा मृत्यू होईल अशा हेतूने जाणीव पूर्वक केलेली कृती
शिक्षा. (१) जखमी. नसल्यास दहा वर्षांपर्यंत कारावास व दंड तसेच (२) कोणी जखमी झाल्यास आजन्म कारावास
कार्यपद्धती. दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायालय

भा दं वि कलम ३०२ ( खून )
जिवे / ठार मारणे.
शिक्षा. मरण किंवा आजन्म कारावास आणि दंड.
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३०४ ( मनुष्य वध )
आपल्या कृत्याने एखाद्या व्यक्तिस मृत्यू येईल याची जाणीव असताना उद्देश्यपूरव कृती करणे.
शिक्षा. आजन्म कारावास अगर दहा वर्षांपर्यंत कारावास व दंड.
कार्यपद्धती. दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३०५ ( आत्महत्या )
अल्पवयीन मुलास अगर वेड्या इसमास आत्महत्येस चिथावणी देणें
शिक्षा. आजन्म कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व दंड
कार्यपद्धती. दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३०६ ( आत्महत्या )
आत्महत्येस प्रवृत्त करणे , चिथावणी देणे.
शिक्षा. दहा वर्षांपर्यंत कारावास व दंड.
कार्यपद्धती. दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३३६ ( केवळ कृती )
एखाद्याची सुरक्षितता किंवा जीवीत धोक्यात येईल अशी हयगयीची कृती करणे.
शिक्षा. तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा दोनशे पन्नास रूपये इतका दंड किंवा दोन्ही
कार्यपद्धती. दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- कोणतेही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३३७ ( साधी दुखापत )
एखाद्याची सुरक्षितता किंवा जीवीत धोक्यात येईल अशी हयगयीची कृती करून दुखापतीस कारणीभूत होणे.
शिक्षा. सहा महिने कारावास किंवा दंड पाचशे रुपये किंवा दोन्ही.
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- कोणतेही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३३८ ( गंभीर दुखापत )
एखाद्याची सुरक्षितता किंवा जीवीत धोक्यात येईल अशी हयगयीची कृती करून गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत होणे.
शिक्षा – दोन वर्षे कारावास किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही.
कार्यपद्धती. दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- कोणतेही दंडाधिकारी

भा दं वि कलम ( ३०४अ )
हयगयीने मृत्यूस कारणीभूत होणे ( अपघात)
शिक्षा- दोन वर्षांपर्यंत कारावास व दंड किंवा दोन्ही.
कार्यपद्धती – दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- प्रथमवर्ग दंडाधिकारी

भा दं वि कलम ३६३ ( पळवून नेणे )
कायदेशीर रखवालीतून समंतीशिवाय पळवून नेणे
शिक्षा- सात वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती- दखलपात्र व जामीनपात्र
न्यायालय – प्रथमवर्ग दंडाधिकारी

भा दं वि कलम ३६३ अ
भिक मागण्यांच्या उद्देशाने अज्ञान व्यक्तिस पळवून नेणे किंवा विकलांग करणे.
शिक्षा. दहा वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती – दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- प्रथमवर्ग दंडाधिकारी

भा दं वि कलम ३६४
पळवून नेणे / अपहरण करणे.
शिक्षा. दहा वर्षांपर्यंत सश्रम कारावास व दंड.
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय – सत्र न्यायालय.

भा दं वि कलम ३६३ अ
खंडणी वैगरे साठी पळवून नेणे अपहरण करणे.
शिक्षा- फाशी किंवा आजन्म कारावास व दंड.
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय – सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३६५
एकाध्यास बेकायदेशीर रित्या गुप्तपणे डांबून ठेवण्यासाठी अपहरण करणे.
शिक्षा – सात वर्षांपर्यंत कारावास व दंड.
कार्यपद्धती -दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय – सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३६६
एखाद्या महिलेच्या इच्छेविरुद्ध विवाह करण्यासाठी बळजबरीने /बेकायदेशीर /संभोग करता यावा यासाठी
वरील प्रमाणे तिला फूस लावण्यासाठी.
शिक्षा – दहा वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय – सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३६६अ
कमी वयाच्या मुलीशी बळजबरीने / बेकायदेशीर संभोग करता यावा यासाठी
वरील प्रमाणे कृती करण्यासाठी तिला फूस लावण्यासाठी
शिक्षा दहा वर्षांपर्यंत कारावास व दंड .
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३६६ ब
बळजबरीने / बेकायदेशीर संभोग करता यावा यासाठी भारता बाहेर आयात करणे.
शिक्षा- दहा वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती – दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३४१( अडविणे / गैर निरोध )
एखाद्याचा जाण्याचा मार्ग बेकायदेशीर पणे अडविणे
शिक्षा- एक महिना कारावास किंवा पाचशे रुपये दंड किंवा दोन्ही
कार्यपद्धती – दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३४२ ( अटकावून ठेवणे / गैर परिरोघ )
एखाद्यास बेकायदेशीर पणे अटकावून ठेवून तेथून बाहेर जाण्यास प्रतिबंध करणे
शिक्षा- दोन वर्षांपर्यंत कारावास व दंड किंवा दोन्ही
कार्यपद्धती दखलपात्र व जामीनपात्र
न्यायालय- कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ५०९ ( महिला अत्याचार विषयी अपराध )
एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार / हावभाव किंवा कृती करणे
शिक्षा- तीन वर्ष कारावास व दंड
कार्यपद्धती- दखलपात्र व जामीनपात्र
न्यायालय- कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३५४अ
एखाद्या महिलेच्या इच्छेविरुद्ध लैंगिक गोष्टींचा मागणी
शारीरिक स्पर्श / अश्लिल देखावे / अश्लिल शेरेबाजी /
शिक्षा- (१) १ ते ३ साठी ३ वर्षांपर्यंत सश्रम कारावास किंवा दंड किंवा दोन्ही (२) अ न ४साठी १ वर्षांपर्यंत कारावास व दंड किंवा दोन्ही
कार्यपद्धती – दखलपात्र व जामीनपात्र
न्यायालय- कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३५३ब
एखाद्या महिलेच्या इच्छेविरुद्ध लगट करून तिला विवस्त्र करील
(२) विवस्त्र होण्यासाठी धाक दाखविल
शिक्षा- तीन वर्षांपेक्षा कमी नाही परंतु सात वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- कोणतेही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३५४ क
(१) एखाद्या महिलेला एकांतवासातील कृती करताना पाहणे.
(२) चित्रण करणे प्रसारित करणे
शिक्षा- एक वर्षापर्यंत कमी नाही परंतु तीन वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती- दखलपात्र व जामीनपात्र
न्यायालय- कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३५४ ड
स्पष्टपणे नकार देऊनही जवळीक करणे
(२) पाठलाग करणे (३) तीच्या इलेक्ट्रॉनिक साधनांवर. वापरावर बारिक लक्ष ठेवणे
शिक्षा- तीन वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती – दखलपात्र व जामीनपात्र
न्यायालय- कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३७६ ( बलात्काराचे अपराध )
बलात्काराचा अपराध
शिक्षा- (१) दहा वर्षांपेक्षा कमी नाही परंतु आजन्म कारावास व दंड
(२) लोकसेवकाने अपराध केल्यास. वीस वर्षांपेक्षा कमी नाही परंतु आजन्म कारावास सश्रम
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३७६ अ
बलात्कार पिढीत व्यक्तिचे मृत्यूस / कोमात जाण्याच्या अवस्थेला कारणीभूत ठरणे
शिक्षा- (१) वीस वर्षांपेक्षा जास्त ते मृत्यू पर्यंत सश्रम कारावास
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

** भा दं वि कलम ३७६ ब
घटस्फोटीत / फारकतीच्या काळात पत्नीशी संभोग. समंतीविना लैंगिक संभोग करणे
शिक्षा- दोन वर्षांपेक्षा कमी नाही परंतु सात वर्षांपर्यंत सश्रम कारावास व दंड
कार्यपद्धती- दखलपात्र व जामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३७६ क
ओळखीची व्यक्ति / नातेवाईक किंवा लोकसेवकाने केलेला बलात्कार
शिक्षा- पाच वर्षांपेक्षा कमी नाही परंतु दहा वर्षांपर्यंत सश्रम कारावास
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र

भा दं वि कलम ३७६ ड
सामुहिक बलात्कार
शिक्षा- वीस वर्षांपेक्षा कमी नाही परंतु आजन्म मृत्यूपर्यंत कारावास व दंड

** भा दं वि कलम ३७६ ड/अ
१६ वर्षांखालील महिलेवर सामुहिक बलात्कार
शिक्षा – आजन्म कारावास व दंड
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३७६ / ब
१२ वर्षांचे खालील महिलेवर सामुहिक बलात्कार
शिक्षा- आजन्म कारावास किंवा देहदंड
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३७६ ई
बलात्काराचा अपराध वारंवार करणे .
शिक्षा- आजन्म कारावास किंवा देहदंडाची शिक्षा
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३७७
अनैसर्गिक संभोग
शिक्षा- आजन्म कारावास किंवा १० वर्षापर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय – सत्र न्यायाधीश

विवाहित महिलांबाबतचे गुन्हे
भा दं वि कलम ४९४
पती किंवा पत्नी जिवंत हयात असताना पुन्हा विवाह करणे
शिक्षा- सात वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती- अदखलपात्र
न्यायालय- प्रथमवर्ग दंडाधिकारी

भा दं वि कलम ४९८/ अ
एखाद्या महिलेच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकांनी तिला क्रुर वागणूक देणे
शिक्षा- तीन वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती- दखलपात्र व जामीनपात्र
न्यायालय- प्रथमवर्ग दंडाधिकारी

भा दं वि कलम ३०४/ ब
हुंडाबळी
शिक्षा- कमीत कमी सात वर्षांपर्यंत कारावास किंवा आजन्म कारावास
कार्यपद्धती : दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३७९ ( चोरी , घरफोडी )
भा दं वि कलम ३७९ उघड्यावरील चोरी / ताब्यातील जंगम /मालमत्ता सदर व्यक्तिचे समंतीविना / अप्रामाणिक पणे नेणे म्हणजे चोरी होय
शिक्षा- तीन वर्षांपर्यंत कारावास व दंड किंवा दोन्ही
कार्यपद्धती: दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय – कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३८० उघड्यावरील घरातील चोरी / राहते घर / मानवी वस्ती स्थान /अथवा सुरक्षित ठेवली असेल अशा कोणत्याही ठिकाणावरील जंगम मालमत्ता धारकांच्या समंतीवाचून अप्रामाणिक पणे चोरणे .
शिक्षा- सात वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती : दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३८१ एकादी व्यक्ति कोणाकडे कारकून / नोकरी / म्हणून काम करीत असेल असताना मालकाच्या ताब्यातील कोणत्याही मालमत्तेची चोरी करील तर
शिक्षा- सात वर्षांपर्यंत कारावास व दंड
कार्यपद्धती : दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ४५४
दिवसा चोरटे गृह अतिक्रमण किंवा घरफोडी
शिक्षा- (१) तीन वर्षांचा कारावास व दंड
(२) चोरीच्या उद्देशाने गृह अतिक्रमण असल्यास दहा वर्षांपर्यंत कारावास वाढेल
कार्यपद्धती- दखलपात्र अजामीनपात्र
न्यायालय- कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ४५७
रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण किंवा घरफोडी
शिक्षा- (१) पाच वर्षांपर्यंत कारावास व दंड
(२) चोरीच्या उद्देशाने गृह अतिक्रमण असल्यास १४ वर्षांपर्यंत कारावास वाढेल.
कार्यपद्धती : दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय – कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ३९२ ( जबरी चोरी )
जर कोणी चोरी करताना अथवा चोरीमध्ये मिळालेली मालमत्ता नेताणा कोणा व्यक्तिस दूखापत करण्याची किंवा मृत्यू घडवून आणण्याची किंवा तसे करण्याची भीती घालणे तर ती चोरी जबरी चोरी होवू शकते.
शिक्षा- दहा वर्षे सश्रम कारावास व दंड जर ही चोरी हमरस्त्यावर सुर्यास्त व सुर्योदय यांच्या दरम्यान करण्यात आली तर सश्रम कारावास चौदा वर्षांपर्यंत कारावास वाढवता येईल
कार्यपद्धती: दखलपात्र अजामीनपात्र
न्यायालय- प्रथमवर्ग दंडाधिकारी

भा दं वि कलम ३९३
एखाद्या व्यक्तीस जागीच दुखापत करण्याची अथवा मृत्यू घडवून आणण्याची भीती घालून चोरी करण्याचा प्रयत्न केल्यास सदर कलमान्वये अपराध होतो.
शिक्षा- सात वर्षांपर्यंत सश्रम कारावास व दंड
कार्यपद्धती : दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- प्रथमवर्ग दंडाधिकारी

भा दं वि कलम ३९४
जबर चोरी करताना आरोपीने फिरयादीला इच्छा पूर्वक दुखापत केली व सदरची दुखापत साधी
( भा दं वि कलम ३२४ मध्ये) नमुद केल्याप्रमाणे अपराध होतो.
शिक्षा : आजन्म कारावास किंवा दहा वर्षांपर्यंत सश्रम कारावास व दंड
कार्यपद्धती: दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- प्रथमवर्ग दंडाधिकारी

भा दं वि कलम ३९७
जबरी चोरी किंवा दरोडा घालण्याचा वेळी आरोपीने प्राणघातक हत्यारांचा वापर करून एखाद्या व्यक्तिस जबर दुखापत केली अथवा तसा प्रयत्न करून एखाद्याचा मृत्यू घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर सदर कलमान्वये अपराध होतो.
शिक्षा: कमीत कमी सात वर्षांपर्यंत कारावास
कार्यपद्धती: दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३९५ ( दरोडा )
जबर चोरी करताना किंवा करण्याचा प्रयत्न करताना गुन्हा करणारे अशा आरोपींची संख्या पाच किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर जबरी चोरी हा दरोडा होतो.
शिक्षा- आजन्म कारावास किंवा दहा वर्षांपर्यंत सश्रम कारावास व दंड
कार्यपद्धती- दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय- सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३९६ ( खूनासहित दरोडा )
दरोडा घालताना सदर गुन्ह्यात सामील असलेल्या पाच किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींपैकी कोणीही खून केला तर त्यातील प्रत्येक आरोपीने खूनासहीत दरोडा घातल्याचा अपराध.
शिक्षा- मृत्यू. आजन्म कारावास किंवा दहा वर्षांपर्यंत सश्रम कारावास व दंड.
कार्यपद्धती – दखलपात्र व अजामीनपात्र
न्यायालय – सत्र न्यायाधीश

भा दं वि कलम ३९९ ( दरोडा घालण्याची पूर्वतयारी )
पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांनी एकत्र जमून दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे
शिक्षा- दहा वर्षांपर्यंत सश्रम कारावास व दंड
न्यायालय- सत्र न्यायाधीश

 दैनंदिन वापरातील भा दं वि ची अदखलपात्र कलमे

कलम. भा दं वि कलम.
तपशील हाताने ठोशाने बुककीने माराहाण इच्छा पूर्वक साधी दुखापत
शिक्षा : एक वर्ष कारावास किंवा एक हजार रुपये दंड
न्यायालय- कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ४०३
तपशील जगंम मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार.
शिक्षा – दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड
न्यायालय – कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ४१७
तपशील दिशाभूल करणे. फसवणूक करणे. शारीरिक व मानसिक
शिक्षा – एक वर्ष कारावास किंवा दंड
न्यायालय – कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ४२७
तपशील आगळीक करून ५०/ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रककमेचे नुकसान करणे
शिक्षा – दोन वर्ष कारावास व दंड
न्यायालय – कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ५००
तपशील : अब्रुनुकसानीचा दावा करणे
शिक्षा: ‌दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही
न्यायालय – प्रथमवर्ग दंडाधिकारी

भा दं वि कलम ५०४
शांतता भंग होईल अशा उद्देशाने अशा अपमान करणे, शिवीगाळ करणे
शिक्षा – दोन वर्ष कारावास व दंड किंवा दोन्ही
न्यायालय- कोणताही दंडाधिकारी

भा दं वि कलम ५०६
तपशील : फौजदारी पात्र , धाकदपटशा करणे , दमदाटी करणे, धमकी देणे .
शिक्षा- दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही

भा दं वि कलम ५०७
तपशील : निनावी संदेशांद्वारे /ओळख लपवून फौजदारी पात्र / धाकदपटशा करणे / दमदाटी करणे / धमकी देणें .
शिक्षा – दोन वर्षांपर्यंत कारावास
न्यायालय- प्रथमवर्ग दंडाधिकारी

भा दं वि कलम १८६
तपशील : सरकारी कामात अडथळा / बोलाचाली करणे /धमकावने / दमदाटी करणे इ .
शिक्षा – तीन महिने कारावास किंवा पाचशे रुपये दंड किंवा दोन्ही
न्यायालय – कोणताही दंडाधिकारी

      वरील सर्व कायदे कलम आपल्या हितासाठी शासनाने तयार केले आहेत . 
  • अहमद नबीलाल मुंडे
  • समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर ,
  • रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
  • रेशन अधिनियम कायदा २०१३ – रक्षक समिती सांगली जिल्हा
  • मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
  • माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
  • संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

वरील कायदे आणि गुन्ह्याची शिक्षा देण्यामागचे आमचे गुन्हेगारी ला आळा घालणे हे उद्दिष्ट आहे. तुम्हाला ही पोस्ट किंवा उद्देश आवडला असेल तर इतरांना शेअर करून आम्हाला मदत करा. आणि समाज गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular