Homeघडामोडीस्वतःची क्षमता ओळखायला शिका - संजय साबळे

स्वतःची क्षमता ओळखायला शिका – संजय साबळे

चंदगड :
‘ मला काय करायला हवे हे ज्याला कळते तो जीवनात यशस्वी होतो . म्हणून स्वतःची क्षमता व आवड ओळखून क्षेत्र निवडा यश हमखास मिळते . ‘ असे प्रतिपादन दि न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यापक संजय साबळे यांनी केले .
ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या विज्ञान विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या निरोप समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ .पी. आर . पाटील होते .
प्रास्ताविक प्रा . एम . एस . दिवटे यांनी केले .
संजय साबळे पुढे म्हणाले , ज्या माणसा कडे विचार असतो तीच माणसे सुंदर जीवन जगतात म्हणून पहिल्यांदा विचार करायला शिका कारण विचारच माणसाला जगायला आणि जिंकायला शिकवतात . “
“मिळालेल्या साधनांचा व वेळेचा योग्य वापर केल्यास यश नक्की मिळते . ” असे मत प्राचार्य डॉ पी आर .पाटील यांनी केले .
यावेळी कु.मीनल मोटर , कु .सोनाली दळवी , संदिप नाईक संदेश गडकरी यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाला प्रा डॉ . एम. एम .माने , प्रा . डॉ. आर . के . तेलगोटे , प्रा . एम. एस .दिवटे , प्रा . हर्षाली सावंत भोसले , प्रा आढाव , प्रा.संदेश पेडणेकर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ . आर. एन . साळुंखे यांनी तर आभार प्रा .संदेश गडकरी यांनी मानले .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular