Homeवैशिष्ट्येभारतातील विलक्षण, अद्वितीय गांवे

भारतातील विलक्षण, अद्वितीय गांवे

भारतातील विलक्षण, अद्वितीय गांवे

1) आळंदी गाव
आळंदी या गावात आजही (गाव वेशीत) मास – मटण मिळत नाही या गोष्टीला 700 वर्षे पूर्ण झालीत.

2)-शनि शिंगणापूर (महाराष्ट्र)
संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.

3)- शेटफळ (महाराष्ट्र)
प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य असल्या सारखी सर्पराजाची उपस्थिती.

4)- हिवरे बाजार (महाराष्ट्र)
भारतातील सर्वात “श्रीमंत” खेडे. ६० अब्जाधीश घरे. एकही “गरीब” नाही. सर्वाधिक GDP असणारं खेडं.

5)- पनसरी (गुजरात)
भारतातील सर्वात “अत्याधुनिक” खेडेगांव.
गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून, Wi-Fi सुविधाही आहेत. गांवातील सर्व ‘पथदीप’ सौरउर्जेवर चालतात.

6)- जंबुर (गुजरात)
भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक “आफ्रिकन” वाटतात. [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]

7)- कुलधारा (राजस्थान)
“अनिवासी” गांव. गांवात कोणीही रहात नाही. घरे बेवारस सोडलेली आहेत.

8)- कोडिन्ही (केरळ)
जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.

9)- मत्तूर (कर्नाटक)
दैनंदिन व्यवहारासह सगळ्या कामकाजासाठी “संस्कृत” भाषेचा वापर करणारे 10,000 वस्तीचे गांव.

10)- बरवानकाला (बिहार)
ब्रम्हचाऱ्यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून गांवात लग्न सोहळाच नाही.

11)- मॉवलिनॉन्ग (मेघालया)
‘आशिया’खंडातील सर्वात “स्वच्छ” गांव.
पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग शिल्प.

12)- रोंगडोई (आसाम)
बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो,
अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव. असं लग्न हा ‘ग्रामसण’च असतो.

13)- कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र)
Korlai village स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगीज गेल्यानंतरही “पोर्तुगीज:” भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.

14)-मधोपत्ती गाव (उत्तर प्रदेश)
एका गावातून ४६ पेक्षा जास्त IAS बनलेले हे गाव, ९० % पेक्षा जास्त सरकारी नोकरी मध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे…

15)- झुंझनु (राजस्थान)
फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती…
६ हजार पेक्षा जास्त सेवा निवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू…

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular