Homeक्राईमकिराणा व्यावसायीकाला ऐन दिवाळीत चोरीचा फटका

किराणा व्यावसायीकाला ऐन दिवाळीत चोरीचा फटका

अमित गुरव – खोराटवाडी ता आजरा येथील किराणा दुकानात रात्री 2 वाजण्याच्या सुमाराला चोरी झाली.
तक्रार दुकान चालक अभिजित आनंदा येजरे यांनी केली असून लक्ष्मी पूजनाची मांडणी केली असता अडीज तोळे मोहन माळ, लक्ष्मी हार तसेच रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
सीसीटिव्ही फुटेज च्या सहाय्यानं आजरा पोलीस त्या चोरांचा शोध घेत आहेत. श्वान पथक तैनात केले असून प्राथमिक माहितीत चोर कर्नाटक मधील असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


चोरट्याने ज्या प्रकारे आत प्रवेश केला तसेच सफाईदार पणे चोरी केली त्यावर ते सराईत असावेत असे वाटते. पोलिस पुढील शोध घेत आहेत. पण या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली.
पोरांनी महिनाभर हाडाची काड केली आणि त्या चोराने हुत्याच नव्हत केली अशी चर्चा उपस्थित ग्रामस्थ करत होते .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular