गडहिंग्लज | प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
गडहिंग्लज शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची ३.०६ एकर जागा आहे. या पैकी ०.७५ एकर जागा प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित जागा पशुसंवर्धन विभागाकडेच ठेवण्याचे ठरवण्यात आले असून, पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार नवीन तालुका पशुसंवर्धन व दुग्धविकास उपायुक्त कार्यालयासाठी स्वतंत्र मजला प्रस्तावित इमारतीत समाविष्ट करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
गडहिंग्लज हे कोल्हापूर जिल्ह्याचे महत्त्वाचे उपविभागीय केंद्र असून येथे सध्या प्रांत कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, सहकार, कृषी आदी विभागांची कार्यालये भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांच्या स्थापनेसाठी स्वतंत्र प्रशासकीय संकुलाची नितांत गरज होती.

पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब्ध झाल्याने, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकाच प्रशासकीय संकुलात सर्व विभाग एकत्र आणता येणार आहेत. यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी एका छताखाली सुविधा मिळणार असून प्रशासनाची कार्यक्षमता वाढणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाणार असल्याची ग्वाही प्रशासनातर्फे देण्यात आली.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचं व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
🎙️ Follow Us 🎙️
You Tube चॅनेल लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=9fVf1D0sqOPFWHQS
व्हाट्सअँप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक