Homeघडामोडीसुर महाराष्ट्राचा ऑनलाईन मराठी गीत गायन स्पर्धेमध्ये हळोलीचा संदीप कांबळे अंतिम फेरीत

सुर महाराष्ट्राचा ऑनलाईन मराठी गीत गायन स्पर्धेमध्ये हळोलीचा संदीप कांबळे अंतिम फेरीत

आजरा (हसन तकीलदार ):-आजऱ्यातील हाळोली सारख्या लहानशा खेड्यातील हरहुन्नरी कलाकार संदीप कोंडीबा कांबळे याने सुर महाराष्ट्राचा पर्व सहावे मराठी गाण्यांच्या मराठमोळी ऑनलाईन गायन स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीतून अंतिम फेरी मध्ये झेप घेतली आहे. हाळोली सारख्या लहानशा खेड्यातला हा कलाकार अत्यंत गरिब आणि प्रतिकूल परिस्थितीतून आपली कला जोपासत या ऑनलाईन गायन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारणे इतके सोपे नव्हते. कलेबद्दल असलेली आत्मीयता आणि जिद्द हीच यशाची गुरुकिल्ली ठरली असल्याबद्दल त्याने सांगितले.


सुर महाराष्ट्राचा ही ऑनलाईन गायन स्पर्धा पुण्यातील निखिल मुळे आणि डॉ. धनश्री हरदास यांच्या ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आली आहे. सूर महाराष्ट्राचा सहाव्या पर्वाच्या उपांत्यफेरीत संदिपने भक्तीगीत सादर करून रसिकांची मने जिंकली. ही स्पर्धा तीन टप्प्यामध्ये असून ऑडिशनमध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे. त्यांच्यामधून तीन स्पर्धक निवडले असून या तीन स्पर्धकामध्ये अंतिम फेरी होणार आहे. या अंतिम फेरीकडे आजरेकरांचे लक्ष लागून आहे. होणाऱ्या अंतिम फेरीत यशस्वी होण्यासाठी संदिपला मित्रपरिवार आणि हळोलीकराकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. गेट टुगेदर, विवाह समारंभ, वाढदिवस इ. कार्यक्रमामध्ये संदीप आपल्या गायनाच्या कलेने रसिकांची मने जिंकतो. गायनाबरोबर तो पेंटिंगचीही कला जोपसतो आहे.

🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचं व्यासपीठ – Link Marathi 🌿

तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.

🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!

   🎙️ Follow Us 🎙️

You Tube चॅनेल लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=9fVf1D0sqOPFWHQS

व्हाट्सअँप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular