आजरा (हसन तकीलदार ):-आजरा येथील रवळनाथ, शिव, आयडीयल कॉलनी येथे बस थांबा व्हावा यासाठी आजरा अन्याय निवारण समितीने राज्य परिवहन मंडळाला लेखी पत्र दिले होते. त्यानुसार या ठिकाणी बस थांबा सुरु करणेसाठी दि. 6/5/2025रोजी राज्य परिवहन प्रशिक्षण बसद्वारे पाहणी करण्यात आली. या पाहणीनुसार रवळनाथ कॉलनीच्या तिट्यावर म्हणजेच भडगावकर वेल्डिंग वर्क्स गांधीनगर रोड या ठिकाणी बस थांबा मंजूर करण्यात आला आहे.
आजरा अन्याय निवारण समितीने ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आजरा, विटे, लाटगाव या मार्गावर रवळनाथ कॉलनी येथे विनंती बस थांबा सुरु करणेसाठी राज्य परिवहन मंडळाकडे पाठपुरावा केला होता. समर्थ कॉलनी, रवळनाथ कॉलनी, शिव कॉलनी तसेच आयडियल कॉलनीतील रहिवाशीयांना सरकारी दवाखाना किंवा आजऱ्याचा स्टँडला जाण्यासाठी अडचण व गैरसोय होत होती. यासाठी रवळनाथ कॉलनीजवळ विनंती बस थांबा सुरु करण्याबाबत लेखी निवेदन अन्याय निवारण समितीने दिले होते.
त्यानुसार विभाग नियंत्रक, राज्य परिवहन कोल्हापूर यांनी लेखी पत्र काढून रवळनाथ कॉलनी तिट्ट्याजवळ बस थांबवून प्रवासी चढउतार करणेबाबत सूचना देऊन सूचना रजिस्टर वर स्वाक्षरी घेणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे याठिकाणी विनंती बस थांबा फलक देऊन योग्य ठिकाणी लावणेस मार्गदर्शन करणेबाबत सूचित करण्यात आले आहे. अन्याय निवारण समितीच्या या विधायक कार्याबद्दल सर्वत्र अन्याय निवारण समितीचे कौतुक होत आहे.
Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक