Homeघडामोडीउत्तुरच्या केंद्रे शाळेचा विद्यार्थी आर्यन पोवार याची आजरा तालुक्यातून जि. प. शैक्षणिक...

उत्तुरच्या केंद्रे शाळेचा विद्यार्थी आर्यन पोवार याची आजरा तालुक्यातून जि. प. शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड


उत्तूर –जिल्हा परिषदेकडून आजरा तालुक्यातून उत्तुर केंद्र शाळेचा विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी एकमेव निवड करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी कु.आर्यन सचिन पोवार यांचा समावेश आहें. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पहावी असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जि. प. व मनपा शाळेतील इयत्ता सहावी व आठवीतील विद्यार्थ्यांची कोल्हापूरमध्ये सरप्राईज निवड परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेत कोल्हापूरसह जिल्ह्यातून सर्व बारा तालुक्यातील गेल्या दोन वर्षात पाचवी जि. प. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेत केंद्र शाळा उत्तूरचा एकमेव विद्यार्थी तालुक्यातून उत्तीर्ण झाला. व त्याची निवड झाली. त्याला वर्गशिक्षक दिनकर खवरे , सौ अलका बामणे,एच.एन.पाटील, संतोष शिवणे, प्रशांत पाटील, केंद्र शाळा मुख्याध्यापक संजय पोवार व कन्या शाळा मुख्याध्यापक एन. टी. पाटील व इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले….

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular