Homeवैशिष्ट्येनिदान आज याला मडकं म्हणू नका

निदान आज याला मडकं म्हणू नका

अक्षय्य तृतीयेची पूजा करायची म्हणून खरेदीला गेलो आणि कुंभाराला म्हणालो “मडकं दे”.तो पटकन माझ्या कडे बघून म्हणाला “या प्रसंगी तरी मडकं म्हणू नका”. खरं तर मलाही माहित नव्हतं त्याला नक्की काय म्हणतात. उत्सुकते पोटी मी त्याला विचारले, “मग काय म्हणतात याला?”. “स्वर्गीय माता म्हणून लाल रंगाचे त्याला *केळी* व स्वर्गीय पिता म्हणून काळ्या रंगाचे त्याला *करा* म्हणतात”. माझ्या मराठी शब्दकोषात दोन शब्द वाढले.मराठीत मातीच्या भांड्याला उपयुक्तते नुसार व प्रसंगानुसार वेगवेगळ्या नांवांनी संबोधले जाते.

बघा अशी आहेत ती नावे —

पाण्याचा … माठ अंत्यसंस्काराला… मडकं नवरात्रात … घटवाजविण्यासाठी.. घट म्संक्रांतीला… सुगडंदहिहंडीला… हंडी दही लावायला… गाडगं लक्ष्मीपूजनाचे… बोळकं लग्न विधीत… अविघ्न कलश आणि अक्षय्य तृतीयेला…केळी व कराखरंच आपली मराठी भाषा समृद्ध व श्रीमंत आहेच.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular