आजरा -: (हसन तकीलदार ):-30 मे 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या एक दिवसीय धरणा प्रदर्शनाच्या तयारीसाठी आज आजऱ्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण मीटिंग पार पडली.. यामध्ये जिल्हा प्रभारी डॉ. उल्हास त्रिरत्ने (जिल्हा प्रभारी )यांनी वन्यप्राण्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना अखल्या गेल्या पाहिजेत तसेच हा लढा टप्प्या टप्प्याने कशा पद्धतीने तिव्र करणार याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते म्हणाले की,वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्या अतिशय गंभीर आहेत अनेकदा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मुळे शेतकऱ्यांचे मृत्यू देखील होत आहेत.
वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच्या काही उपाययोजना आहेत त्याची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे.
प्रतिबंधात्मक उपाय करताना
वन तळी म्हणजेच पाणी व जंगलातील चारा पुरेपूर उपलब्ध करणे गरजेचे आहे.ज्या जंगलांमध्ये निलगिरी, अष्टम बाभळ, सागवाण, बांबू लागवड केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडून चारा उगवत नाही. अशा जंगलांचे टप्प्याटप्प्याने विरळीकरण करून त्यामध्ये भारताच्या वातावरणाला अनुकूल असणारी देशी प्रजातीची झाडांची लागवड करणे उदाहरणार्थ जांभूळ, आंबा, ऐन, किंजळ, हिरडा, चिंच,इ.
वनविभाग व शेतकऱ्यांच्या जमिनी याच्या हद्दीवर 10 फूट खोल 10 फूट रुंद अशी चर वनविभागाच्या हद्दीत मारली पाहिजे. व त्यानंतर जंगलाच्या शेतकऱ्याच्या हद्दीकडील बाजूस किमान आठ ते दहा फूट उंचीचे सौर कुंपण असले पाहिजे जेणेकरून कोणताही वन्य प्राणी ते हद्द ओलांडून शेतकऱ्याच्या हद्दीत येणार नाही अथवा कोणताही शेतकरी ही हद्द ओलांडून वनविभागाच्या हद्दीत जाणार नाही.
त्याचप्रमाणे नुकसान भरपाईच्या उपाययोजनासुद्धा आखल्या पाहिजेत यामध्ये शेतकऱ्यांना इनकम रिस्क मॅनेजमेण्ट इन ऍग्रीकल्चर या कायद्यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी.
तसेच सर्व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी अथवा मृत झालेल्या पीडित व्यक्तींना तात्काळ त्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी.
सद्य स्थितीत देण्यात येणारी नुकसान भरपाई अतिशय तोकडी असल्याने ती वाढवण्यात यावी.
वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे व त्यांच्यामुळे इतर कुणालाही हानी पोहोचू नये ही जबाबदारी सर्वस्वी सरकारची आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या घरातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी.
यानंतर तांत्रिक उपाययोजना
तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू पावलेल्या जखमी झालेल्या व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुलभता यावी यासाठी एखादे ॲप्लिकेशन सरकार द्वारे चालवण्यात यावे.जंगल समृद्ध केली पाहिजेत. जंगलात मानवी हस्तक्षेप झाल्याने जैवसाखळी नष्ट झाली आहे. त्यामुळे जंगली प्राणी गाव वस्तीवर व रस्त्यावर येत आहेत. यासाठी सरकारने आणि वनविभागाने योजना आखल्या पाहिजेत.
याखेरीज ज्या शेतकऱ्यांवर गव्याने व इतर वन्य प्राण्यांनी हल्ले केले आहेत आणि त्यांना अद्याप नुकसान भरपाई दिलेली नाही, अशा पीडित लोकांना नुकसान भरपाई न दिल्यास व पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी कोणतीही उपाययोजना न केल्यास वनविभागाच्या व सरकारच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने 30 मे 2025 रोजी आजरा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सरकार व प्रशासन जबाबदार असेल असे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी डॉ. सुदाम हरेर म्हणाले की, आजरा तालुक्यासाठी 108 रुग्णवहीका सुरु करावी. महागाव, हलकर्णी या मार्गासाठी सायंकाळी चार नंतर एस. टी. ची सोय नाही त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आपल्या गावाना जाताना कोणतीही सुविधा अथवा वाहन उपलब्ध होत नाही त्यामुळे या प्रवाशांना जंगल मार्गातून चालत जावे लागते यामुळे वन्य प्राण्यापासून त्यांच्या जिवितास धोका निर्माण होतो म्हणून या मार्गावर सायंकाळी पाच सहा नंतर एस. टी. ची सोय करावी अशी मागणी केली.
यावेळी डॉ. उल्हास त्रिरत्ने(जिल्हा प्रभारी ), डॉ. सुदाम हरेर(तालुका प्रमुख ), राहुल मोरे,अमित सुळेकर, शरद पाटील(गडहिंग्लज ता. प्रमुख ), किरण देसाई, झूल्फिकार शेख, तुकाराम कांबळे, शेखर कांबळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते..
लिंक मराठी व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून लिंक मराठी Live चे अपडेट पाहू शकता .
*Follow Us*

मुख्यसंपादक