Homeवैशिष्ट्येशंख वाजवण्याचे फायदे

शंख वाजवण्याचे फायदे

शंख वाजवण्याचे फायदे कोणते ?
शंख वाजवने आरोग्यासाठी ही उत्तम आहे हे कमी लोकांनाच माहीत असेल.. तर बघू रोज शंख वाजवण्याचे काय फायदे आहेत…

स्नायू मजबूत होतात
शंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात.

फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होतो
शंख वाजवण्याने प्रोस्टेट क्षेत्रावर दबाव पडतो आणि याने प्रोस्टेट स्वास्थ सुधारतं. हे प्रोस्टेट वृद्धी रोखण्यात मदत करतं.फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी व फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होता आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते.

थायरॉईड ग्रंथीत सुधार
शंख वाजवल्याने थायरॉईड ग्रंथी आणि वोकल कोड्सचा व्यायाम होतो.

बोलण्यात स्पष्टता
यामुळे आपल्या बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यासंबंधी समस्या दूर होतात. बोबडे बोलणार्‍या मुलांना शंख वाजवायला हवा याने त्यांची वाणी सुधारेल.

सुरकुत्या दूर होतात
शंख वाजवताना चेहर्‍याचे स्नायू खेचले जातात याने फाईन लाइन्स आपोआप दूर होण्यात मदत मिळते.

त्वचा रोग दूर होतात
रात्र भर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. सकाळी या पाण्याने शरीरावर मालीश करावी. याने त्वचेसंबंधी रोग दूर होतात.

ताण दूर होतो
शंख वाजवल्याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि ताण कमी होण्यात मदत मिळते.

नकारात्मकता दूर होते
शंख वाजवताना त्यातून ऊँ ध्वनी बाहेर पडते ज्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता पसरते.

हार्ट अटॅकपासून बचाव
नियमित शंख वाजवणार्‍यास हार्ट अटॅकचा धोका नसतो. शंख वाजवल्याने सर्व ब्लॉकेज उघडून जातात.

संकलन – लिंक मराठी परिवार. …..

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular