Homeक्राईमशिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जमादार ( शिंदे गट ) चा जाहीर निषेध ...

शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जमादार ( शिंदे गट ) चा जाहीर निषेध – आजरा तालुका पत्रकार संघ

आजरा (प्रतिनिधी ) – दैनिक सकाळ चे मुरगूड प्रतिनिधी श्री. प्रकाश तिराळे ( रा. कुरूकली ) यांना राजेखान जमादार शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ( एकनाथ शिंदे गट) यांनी मारहाण तसेच शिवीगाळ केली. पत्रकार तिराळे यांनी कोणाचेही नाव न लिहिता एक बातमी छापली होती. बदनामी केली या रागातून जमादार आणि त्याचे साथीदार आसिफखान उर्फ मॉन्टी आसदखान जमादार , संदीप अशोक सणगर यांनी तिराळे यांना मारहाण तसेच शिवीगाळ केली.

  • कोणती बातमी छापली होती
  • काही दिवसापूर्वी एका समाजातील दोन कुटुंबियातील भांडणे विकोपाला गेली पण ती एका पदाधिकाऱ्याने वाठवली हे संबधित कुटुंबियांच्या लक्षात आल्याने दोन्ही कुटुंबीयांनी (महिलांनी ) एकत्र येऊन भर वस्तीतील चौकात मारले . ही बातमी लावली म्हणून तिराळे यांना मारहाण केली असल्याचे समजते.
  • आजरा तालुका पत्रकार संघ आणि कोल्हापूर वेलफेअर रिपोर्टर आजरा यांच्ये कडून या घटनेचा निषेध आणि कारवाई करण्यासाठी मागणी केली. सर्व पत्रकार खवळले असून कोल्हापूर जील्हात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.
  • आजरा पोलीस निरीक्षक , आजरा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात अध्यक्ष बशीर मुल्ला , रणजित कालेकर, सदाशिव मोरे, ज्योतीप्रसाद सावंत , सुनिल पाटील, कृष्णा सावंत , संभाजी जाधव , विकास सुतार , सुभाष पाटील, अमित गुरव यांच्या सह्या आहेत.

सदर बातमी छापली होती.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular