आजरा (हसन तकीलदार ):महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा आजरा तर्फे रक्तदान शिबीर व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात 51जणांनी रक्तदान केले तर अण्णाभाऊ सहकारी सूत गिरणी खेडे येथे 1001वृक्ष रोपांचे रोपणाचा शुभारंभ करण्यात आला .

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले. आजरा महाविद्यालय येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.51 जणांनी रक्तदान केले. यावेळी जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्याधिकारी डॉ. अनिल देशपांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, सामाजिक कार्यकर्ते रणजित सरदेसाई, संभाजीराव सरदेसाई, अभिजित रांगणेकर, वैभव लक्ष्मी ब्लड बँकेचे सतीश पवार, जयवंत सुतार, योगेश पाटील, राजू दीक्षित, योगेश देसाई तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तर आण्णा भाऊ सह. सूतगिरणी खेडे येथे युवा नेते तसेच भाजपचे आजरा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले. 1001वृक्ष रोपांचे यावेळी रोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक अमोल वाघ, सचिव सचिन सटाले, डॉ. अनिल देशपांडे, जोत्स्ना चराटी (माजी नगराध्यक्षा ), युवराज येसणे, उदयकुमार सरदेसाई, मनिष टोपले आदिजण उपस्थित होते.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



