Home Blog Page 218
आज भरपूर दिवसांनी मोबाईल मध्ये फिल्म पाहिली."मुलशी पॅटर्न" खरंतर फिल्म खूप काही विचार देऊन गेली त्यातले मुद्दे खुप काळजा प्रयत्न गेले त्या तुन दोन गोष्टी कळल्या कि- आपली शेती खरंच कोणाला ही विकु नये कारण आपली शेती म्हणजे खरं सोनं उगवणारी आहे..‌.आणि दुसरी गोष्ट म्हणजे- काहींनी दिवस गाजवलेल असतात…. काही जन दिवस गाजवत असतात… आणि काही जण दिवस...
तस तर खूप जागा, कृती आहेत आनंदाच्या. जस की फिरण, लिहणं, वाचन, पाऊस, व्यायाम, प्राणायम करणं, मित्रांसोबत चहा,गप्पा, आणि अजून बऱ्याच ठिकाणी मला खूप आनंद होतो.आणि एक महत्वाची गोष्ट दुःख, वेदना यामध्ये आनंद म्हणण्यापेक्षा सुकून आहे. हा वेदनेत सुकून असतो. म्हणजे मला तरी तस जाणवत.आपल्या सोबत लोक खोटं बोलतात, कधी कधी जवळच्या व्यक्तीचे काही शब्द कानातून सरळ काळजात घुसतात,...
मागच्या रविवारी मार्केट मध्ये महांतेश या मित्रासोबत किरकोळ खरेदी करण्यासाठी गेलो होतो. मित्राला नाश्ता पार्सल हवा होता त्यामुळे आमची स्वारी एका प्रसिद्ध डोसा बनवणाऱ्या हॉटेलच्या समोर थांबली. मित्र आतमध्ये पार्सल आणण्यासाठी गेला आणि मी त्याची प्रतीक्षा करू लागलो होतो. तो चौक असल्यामुळे तेथे रिक्षा थांबल्या होत्या. इकडे तिकडे पाहण्यात गुंग असताना थोड्याशा समोर एक वयस्कर गृहस्थ अंदाजे वय ७५...
पुरुषोत्तमपुरी एक सांस्कृतिक ठेवामहाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे ,तसेच मंदिरे, उत्सव व परंपरा हा ही भारतीय संस्कृतीच्या सांस्कृतिक संचिताचा एक भाग आहे .असाच प्राचीन इतिहास मराठवाड्यातील पुरुषोत्तपुरी या गावाला लाभला आहे.बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तमपुरी येथे श्री पुरुषोत्तमाचे मंदिर आहे. अप्रतिम वास्तुशास्त्राचा नमुना असलेले हे मंदिर म्हणजे संस्कृती -परंपरा - इतिहास याचा मूर्तिमंत पुरावाच आहे .पुरुषोत्तम मासामध्ये येथे...
आज तिने मागून वळून पाहिलंच नाही.निरोप घेताना दहावेळा मान मागे वळवून मला पाहणारी कस्तुरी आज बदलताना पाहिली.कुणीतरी काळजात सुई घुसवावं अशी काहीशी वेदना मुक्याने बोलकी होताना मी अनुभवली.डोळ्यातून आपोआप पाणी आलं.कस्तुरी खूप दूर निघून गेली होती.नजरेआड होईपर्यंत तिला पाहतच राहिलो.कस्तुरी निघून गेली की मी कायम एक दगड उचलून कोणत्या तरी दगडावर नेम धरून तो फेकायचो.जर नेम बरोबर लागला तर...
उद्देश भरकटला की माणसंसुद्धा त्या उद्देशाच्या मागे हताशपणे भरकटली जातात आणि स्वतःच भरडलीही जातात. मग उद्देश आणि ध्येय याचा विसर पडुन तिच माणसं पळतेल्याच्या पाठी लागतात. समाजातलं आपलं स्थान पक्कं करण्यासाठी, श्रेयासाठी समाजसेवा हा एक उरलेला उपाय शोधून राजकारणी मुखवटा परिधान करून समाजाला विकासाच्या टोप्या घालण्याचं महत्वाचं कार्य अशा भरकटलेल्या माणसांकडून केलं जातं. ...
खरं तर आज कालचा जमानाच वेगळा असे म्हटले जाते.माणूस खुप पुढे गेला किंवा माणसा मध्ये सुधारणा झाली असे सर्व जण म्हणतात.आजच विज्ञान खुप पुढे गेलं हे ही मी मानतो.पण आजुबाजुला जरा बारीक लक्ष दिला तर आपण कोठे आहोत खऱ्या अर्थाने आपला समाज कोठे आहे याचाही विचार करायला हवा.आपण देवाला नैवेद्य ठेवतो.खरं तर देवाला नैवेद्य दाखवला की तो नैवेद्य कोठे...
काल परवापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मध्ये जे शाब्दिक युद्ध सुरू आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. राणे व ठाकरे समर्थक कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत यामध्ये बहुत करून शेतकऱ्यांची पोर आहेत.आपल्या नेत्याबद्दल जर कोणी काही बोलत असेल तर हि पोरं मरायला तयार आहेत आणि मारायला ही. मात्र दुर्दैव आपला...
तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथशास्त्री नित्यनेमानं रोज विष्णूसहस्त्रनामाचं पठण करीत बसत असत. शास्त्रीबुवा अत्यंत गरीब होते..घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत..शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या..फाटलेल्या लुगडयाला गाठी मारून नेसायची ! रोजचं दारिद्र्य ते कसंबसं सहन करायचे..पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्रयाचे हे कांटे त्याना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे !..आस-पास..शेजारी-पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घरा-घरातली...
एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्यावरती परत फोन करू नका , कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल.तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्याअगोदर परत करा , तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबतएखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेनूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका , शक्य असल्यास देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगातुझ अजून...