तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथशास्त्री नित्यनेमानं रोज विष्णूसहस्त्रनामाचं पठण करीत बसत असत. शास्त्रीबुवा अत्यंत गरीब होते..घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत..शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या..फाटलेल्या लुगडयाला गाठी मारून नेसायची ! रोजचं दारिद्र्य ते कसंबसं सहन करायचे..पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्रयाचे हे कांटे त्याना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे !..आस-पास..शेजारी-पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घरा-घरातली...
एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्यावरती परत फोन करू नका , कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल.तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्याअगोदर परत करा , तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबतएखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेनूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका , शक्य असल्यास देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगातुझ अजून...
चहा पिण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी पद्धत असते. त्याचे निरीक्षण केल्यास स्वभावाचा बर्यापैकी अंदाज घेता येतो. आपणही निरीक्षण करा आणि अंदाज बांधा…
चहा घ्यायचा का चला चहा घेऊ, स्वतःहून अशी ऑफर देणारे सर्वसमावेशक स्वभावाचे असतात. यांचा फारसा कुणाशी वाद नसतो…चहाला प्रथमदर्शनी नाही म्हणणारे परिस्थितीचा अंदाज घेऊन वागत असतात..मोठा भुरका मारून चहा पिणारे फारशी कोणाची तमा बाळगत नाहीत. जे योग्य वाटेल ते...
काश्मीर घाटातून एक मेजर त्याची तुकडी घेऊन पायी चालला होता. हिमवर्षावाने वाहने जाऊच शकत नव्हती. एव्हाना त्या तुकडीला चाल करून पाच-सहा तास झाले होते. पौर्णिमेची मध्यरात्र होती.
मेजरला चहाची तलफ आली. पण वाटेतली सर्वच दुकानं बंद.
परमेश्वरा! आता चहा-बिस्किटे तरी मिळू देत रे….!
मनातल्या मनात देवाचा धावा तो मेजर करत होता. कच्चा शिधा शिजवायची ही सोय नव्हती.
दोन किमी पुढे गेल्यावर एक टपरी...
एका शाळेतील एक शिक्षक सेवानिवृत्त झाले. तेंव्हा शासनाने तालुक्यातीलच एका नविन शिक्षकाची नेमणूक केली. ते शिक्षक त्या शाळेत रुजू होण्यासाठी एस.टी. बसने निघाले. कंडक्टरला पैसे दिले आणि ते जागेवर बसले.
कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम शिक्षकाला परत केली. तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, त्यात १० रुपये जास्त आले आहेत. शिक्षकांने असा विचार केला की, आता कंडक्टर घाईत...
केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ॲालेम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर दूर होता त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, अबेलने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते, सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करीत होते, तेवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून अंतिम रेषेच्या एक मीटर आधीच थांबला.
त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की अंतिम चिन्ह न...
भादवण पासून साधारण २ ते २.५ किमी वरील एक छोटेसे गाव, मासेवाडी……कधी उत्तूर ला जायचं झालंच तर मासेवाडी मार्गे जायचा योग येतो. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जवळचा रस्ता म्हणून या मार्गाने जाणं व्हायचं बाकी मासेवाडीमध्ये काय आहे बघण्यासारखं ही भावना सर्वांचीच असायची. कच्चे आणि खराब रस्ते, त्यावरुन वाहणारे सांडपाणी, गटारांची असणारी कमतरता आणि त्यामुळे दिसणारी अस्वच्छता हे चित्र...
व्यवसाय करण्याचा निर्णय घेऊन आपण या टप्प्यावर पोहोचलो आहोत. आता जगातील कोणतीही ताकद आपल्याला आपला व्यवसाय चालू करण्यापासून रोखू शकत नाही, कारण आपली उत्तम मानसिकता तयार झालेली असते. त्यातून आपण व्यवसायच करणार हे आपले ठाम मत तयार होऊन कित्येक दिवस उलटून गेलेले असतात. आपल्यातला विश्वास वाढलेला असतो. आपण आपला व्यवसाय ठरवलेला असतो. वेळकाळाची तमा न बाळगता आपण बिझनेस प्लॅन...
आजचा दिवस तसा अस्वस्थेतच गेला.सकाळी घरुन निघालो अमरावती कोर्टात जाण्यासाठी पण एक अस्वस्थता सोबत घेऊनच.अस वाटत होत की आज काही तरी वाईट घडणार आहे,एक प्रकारची मानसिक अशांततेच वादळ घोंघावत होत.त्याच अस्वस्थेतच कोर्टाची कामे आटोपली,आणि चांदुर ला जायला निघालो. चांदुर रेल्वे कोर्टाचे काम आटोपले आणि एका वकील मित्राकडे एका प्रकरणाची चर्चा करण्यासाठी परत अमरावती जाणे भाग होते.मग काय निघालो परत...
कार्यक्रम दुपारी तीन वाजता होता.आणि मी स्टॅण्ड वर बस मधून उतरलो तेव्हा बारा वाजले होते.तीन तास मी आधी पोहचलो होतो.संयोजकाला याची काही कल्पना मी दिली नव्हती.हातातली माझी पिशवी घेऊन मी स्टॅण्डच्या बाहेर आलो.पाहतो तर चौकात माझा फोटो असलेलं बॅनर लावलेलं होतं.त्या दिवशी होणाऱ्या संमेलनाचा मी प्रमुख पाहुणा होतो.हे प्रमुख पाहुणा वैगेरे असलो की मला जरा कायम अवघडल्यागत होत असतं.लोकांनी...










