आजरा (हसन तकीलदार :-मोरेवाडी ता. आजरा येथील पाझर तलावात गंगाराम आडुळकर या शेतकऱ्याची अंदाजे तीन एकर पेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेली असून दोन वर्षे झाली तरी अजूनही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. मागील दोन तीन वर्षापासून ते जलसंधारण कार्यालयाच्या पायऱ्या झीझवल्या तरीसुद्धा त्यांना आजपर्यँत न्याय मिळालेला नाही. म्हणून शेवटी त्यांनी आपल्या परिवारासहित आज तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. अखेरीस...
"आपुलकीचे नाते – एकत्र कुटुंबाचे सौंदर्य"
आजच्या धावपळीच्या युगात, कोणी कुठे धावतोय हे कळेनासं झालंय. करिअर, शिक्षण, नोकरी, सुविधा यांच्या मागे लागून आपण नकळत एक गोष्ट मागे सोडून देतो—ती म्हणजे एकत्र कुटुंब. म्हणूनच ‘एकत्र कुटुंब दिन’ हे नुसते एक साजरे करायचे औपचारिक कारण नाही, तर आपल्या मुळाशी जाण्याची एक संधी आहे.
एकत्र कुटुंब म्हणजे फक्त अनेक लोक एकत्र राहणं नाही, तर...
छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. ते अत्यंत विद्वान, निर्भय आणि तेजस्वी योद्धा होते.
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास:
शिक्षण व विद्वत्ता:
संभाजी महाराजांना संस्कृत, मराठी, हिंदी, फारसी, इंग्रजी आणि पोर्तुगीज या भाषांचे उत्तम ज्ञान होते. लहानपणापासूनच त्यांनी ग्रंथांचा अभ्यास केला होता. 'बुद्धिभूषण' हा संस्कृत ग्रंथ...
आजरा (हसन तकीलदार ):-डिजिटल आणि प्रगत युगात जग संकुचित होऊन जवळ आले आहे. सेकंदात माणूस अमेरिकेशी संपर्क साधू शकतो. क्षणात जगाचा आढावा घेऊ शकतो परंतु घराच्या भिंतीला लागून असलेल्या भिंतीपलीकडे असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांशी आपला संपर्क तुटत चालला आहे. जो तो आपापल्या जगात व्यस्त आहे. प्रगत युगात माणसाची माणुसकी हरपल्याचे चित्र दिसत आहे. भाऊबंदकी टोकाची झाली आहे. शेतातील एक ओपा...
आजरा :दहावी परीक्षेचा आजरा तालुक्याचा निकाल यंदा 97.83% इतका लागला आहे. एकूण 1,247 विद्यार्थ्यांपैकी 1,220 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील 24 शाळांनी 100% निकालाची कामगिरी बजावली आहे.
सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये निकालाची हुरहूर लागली होती. पण निकाल लागताच जवळपास सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते. काही लोकांनी पेढे वाटून तर काही काही विद्यार्थ्यांनी फटाके वाजवत आपला...
गडहिंग्लज -: सामाजिक शांतता बिघडवणारी घटना खानदाळ ता. गडहिंग्लज येथे घडली. त्यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.
झाहिद इस्माईल मकानदार ( वय २० ) रा. खनदाळ याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, तसेच योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह व विडंबनात्मक पोस्ट केली. ही बाब समोर येताच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलिस अधीक्षक रामदास इंगवले...
घडामोडी
पाकिस्तानचे शेपूट वाकडचं ; शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन; जम्मूच्या सीमेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ला
अमित गुरव
नवीदिल्ली- भारत आणि पाकिस्तान यांच्यात ८६ तास चाललेल्या संघर्षानंतर शनिवारी संध्याकाळी ५ वाजता शस्त्रसंधीची घोषणा झाली. दोन्ही देशांनी याबद्दलचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्ताननं अवघ्या ३ तासांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पु्न्हा एकदा गोळीबार सुरु केला आहे. पाकिस्तानकडून ड्रोन हल्लेदेखील केले जात आहेत. श्रीनगरमध्ये स्फोटांचे ४ ते ५ आवाज ऐकू आलेले आहेत. सांभा सेक्टरमध्ये सायरन वाजू लागले आहेत. पाकिस्तानी...
इस्लामाबाद : भारताने अलीकडेच सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या अचूक हवाई कारवायांमुळे पाकिस्तानमध्ये घबराट उडाली आहे. एवढंच नाही तर या धक्क्याने पाकिस्तानचा एक माजी सैन्य अधिकारी आणि सध्या सत्ताधारी पक्षाचा खासदार थेट संसदेत ढसाढसा रडला! "अल्लाह हमारी हिफाजत करे" असे आर्जव करत तणावग्रस्त आवाजात हा खासदार थरथरत बोलला. हे दृश्य आता संपूर्ण पाकिस्तानचं अपयश अधोरेखित...
आजरा -: नरेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भादवण मुंबई या मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री नरसेश्वर जयंती सोहळा रविवार दिनांक 11/ 5 /2025 रोजी संपन्न होणार आहे.
यावेळी सकाळी नऊ वाजता नर्सेश्वर अभिषेक तर बारा वाजता सत्यनारायण पूजा नवविवाहित जोडपे श्री व...
कोण आहेत सोफिया कुरेशी ?
सोफिया कुरेशी यांचा जन्म १९८१ मध्ये वडोदरा ( गुजरात ) येथे झाला. त्यांनी बायोकेमेस्टी तून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून १९९९ मध्ये चेन्नई स्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मधून भारतीय लष्करात प्रवेश केला. त्यांनी सहा वर्ष संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेत काम केले आहे . बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास एक्सरसाईज फोर्स १८ मध्ये भारतीय तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या त्या...







