Homeआरोग्यब्रा चा इतिहास आणि बरच काही…

ब्रा चा इतिहास आणि बरच काही…

सध्या हेमांगी कवी यांनी लिहलेली बाई , बुब्स , ब्रा बद्दलची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. ती पोस्ट वाचायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करू शकता.

अंग तुला माहीत आहे का ? जगात नो ब्रा डे सुद्धा साजरा करण्यात येतो ; कविता आपल्या वर्गमैत्रिण असलेल्या सुषमा ला म्हणाली. त्यावर त्या दोघींचे संभाषण सुरू झाले. मला हेच काय पण ब्रा कधी , कोणी , केव्हा याचा प्रवास कसा सुरू झाला या सर्वांची माहीती आहे असे सांगताच कवितांच्या आकांशा उंचावल्या व लक्षपूर्वक ऐकू लागली.
फ़्रेंच शब्द असलेल्या ब्रेसीयर्स (brassiere ) या शब्दापासून ब्रा शब्द तयार झाला याला मराठीत चिलखत असा अर्थ होतो. कवितांच्या प्रश्नार्थक नजरेकडे पाहून सुषमा म्हणाली हो ते युद्धासाठी वापरत होते तेच छातीच्या संरक्षणासाठी . पण त्यावेळी महिलांसाठी नवी फॅशन पद्धत तयार केली त्याला Corset म्हणत.

ब्रा ची सुरवात १४ व्या शतकातील आहे याचे पुरावे आहेत. त्यावेळी आपले स्तन झाकण्यासाठी महिला ऐका पट्टीचा वापर करत ती ब्रा सारखीच होती.
आता कवितांची उत्कटा ताणली , त्यामुळे ती मध्ये-मध्ये प्रश्न विचारत होती.

कोरसेट्स का व कसे काय बंद झाले कारण ते सध्या तरी नाहीतच..? कविता म्हणाली .
युरोपमध्ये तेव्हा कोरसेट्स ची फॅशन झपाट्याने वाढत गेली ; त्यामुळे कालांतराने जड व लोखंडी कोरसेट्स कापडाचे बनल्याने हलके बनले. कोरसेट्स हे श्रीमंत महिला वापरत. २० व्या शतकापर्यंत ह्या सोबतच कापडी ब्रा ची पण सुरवात होत होती. तर काही ठिकाणी हलक्या असल्याने स्लिप चा वापर होई . दुसऱ्या महायुद्धात धातूची गरज वाढली आणि त्या आसपासच्या काळात कोरसेट्स बंद होत गेले.

पुश अप ब्रा ची निर्मिती कधी व का झाली ?
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला पुश अप ब्रा ची निर्मिती झाली त्यामुळे महिलेची फिगर व्यवस्थित दिसत होती. १९१२ मध्ये जर्मनीच्या सिल्मन यांनी व्यावसायिक स्तरावर ब्रा चे उत्पादन सुरू केले. व १९१३ साली त्यांच्या कंपनीला पेटेंड मिळाले. युरोप , अमेरिका यामध्ये प्रचलित झालेली ही ब्रा ची फॅशन इतरही काही देशात पोहचली. कालांतराने काहीकारणास्त्व ती कंपनी बंद पडली पण पेटंड त्यांच्याकडे असल्याने पुढच्या ३० वर्षात दीड कोटी डॉरल ची म्हणजे आजच्या हिशोबाने कित्येक अब्जावधी रुपयाची कमाई केली.

ब्रा ची साईज सर्वप्रथम कोणी ठरवली ? ब्रा ह्या शब्द कसा तयार झाला?
१९३० पर्यन्त ब्रा ला ब्रेसिअर्स म्हटलं जाई. १९३४ मध्ये हाप्रल बझार यांनी कॉलेजवयीन मुलींचा सर्वे केला त्यात त्या ब्रेसीयर्स ला शॉटकट्स मध्ये ब्रा म्हणत असल्याचे दिसून आले आणि त्यानंतर ब्रा या शब्दाची व्याप्ती वाढली. १९३२ ला SH camp & company ने पहिल्यांदा ब्रा च्या साईज ठरवल्या त्यात A पासून D प्रयन्त साईज होत्या . औद्योगिक क्षेत्रातील क्रांतीसोबतच फॅशन इंडस्ट्री मध्ये क्रांती घडून आली . आणि विविधरंगी , मऊ , हलक्या ब्रा बाजारात उपलब्ध झाल्या. ही माहिती सुषमाला कशी व कोठून मिळाली या विचारत कविता होती…
ब्रा घालण्याचे फायदे – तोटे काय? नो ब्रा डे आंदोलन का व कधी सुरू झाले ह्या प्रश्नांची उकल सोडवणार होती पण शाळेची बेल वाजली आणि बाकी माहिती नंतर म्हणत दोघीही क्लास साठी वर्गात निघून गेल्या.

संकलन – टीम लिंक मराठी
अनुवाद- अमित गुरव

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular