Homeघडामोडीदहावीच्या विद्यार्थ्यांना उद्या हॉल तिकीट मिळणार - बोर्ड

दहावीच्या विद्यार्थ्यांना उद्या हॉल तिकीट मिळणार – बोर्ड

पुणे- फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांचे हॉलतिकिट कधी मिळणार याबाबत पालक व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. पुढील दोन दिवसांत मुलांना हॉलतिकीट मिळणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारी म्हणजेच २० जानेवारीला ऑनलाईन दिली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होणार आहे. शाळेला हे हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही असे राज्य शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं आहे. राज्य मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान, होणार आहे. या परीक्षेसाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीनं विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधनेच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंटींग करून त्यावर मुख्याध्यापक यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करून ते मुलांना द्यावे लागणार आहे. ज्या आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस आहे त्यांचीच प्रवेशपत्रे पेड स्टेटस अँडमिट कार्ड या पर्यायाव्दारे उपलब्ध होणार आहे. उशिरा आवेदनपत्रे भरलेल्या व एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ही एक्स्ट्रा सीट नंबर अँडमिट कार्ड या या पर्यायाद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्या मुलांचे प्रवेश पत्र गहाळ झाले तर त्या माध्यमिक शाळांनी प्रवेश पत्राची पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने डुप्लीकेट प्रवेश पत्र असा शेरा देऊन ते विद्यार्थ्याना द्यावे लागणार आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular