Homeक्राईमकोल्हापुरात तरुणावर अंधाधुंद गोळीबार

कोल्हापुरात तरुणावर अंधाधुंद गोळीबार

कोल्हापूर (प्रतिनिधी ) -: राज्यात वाढत चाललेले गुन्हेगारीकरण चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे याला आळा बसवणे हे प्रशासनासमोर आव्हान आहेच पण आता कोल्हापुरात तरुणावर अंधाधुंद गोळीबार या घटनेने खळबळ माजली.
रविवारी रात्री जवाहर नगर कोल्हापूर येथील यादव कॉलनी मद्ये राहणारा तरुण जेवण करून बाहेर गेलेला असताना चारचाकी गाडी घेऊन आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात दोन राऊंड हवेत फायार झाले तर एक गोळी त्याच्या मांडीत घुसली. भयानक गोष्ट म्हणजे इतके घ्याल्यावर त्या आरोपींनी तरुणावर कोयत्याने डोक्यावर वार केले. माहिती मिळताच पोलीस आले . सध्या त्या तरुणावर उपचार सुरू आहेत . पुढील तपास सुरू केला आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular