आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीच्या सन 2025-30 या पंचवार्षिक निवडणूकीचे वारे सुरु झाले आहे. मतदार याद्या दुरुस्ती व हरकतीबाबतचे कामकाज युद्ध पातळीवर सुरु आहे. परंतु या मतदार यादीतील चुका या गंभीर, अनियमितता तसेच बोगस मतदार यांचा भरणा दिसून येत आहे. संभाव्य उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार मतदार आपापल्या वॉर्डात खोटे पुरावे सादर करून नोंदणी करून घेतल्याचे आरोप होताना दिसून येत आहेत. यासाठी योग्य दुरुस्ती व हा सावळा गोंधळ दूर करण्याची मागणी आजरा अन्याय निवारण समितीने करीत निवडणूक निर्णय अधिकारी व आजरा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
आजरा नगरपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेपासून इच्छुकांची भाऊ गर्दी वाढतच चालली आहे. राजकारणातील घराणेशाही आणि ठेकेदारी मोडीत काढण्यासाठी युवा वर्ग सरसावताना दिसत आहे. “चेहरा नवा, बदल हवा “असे म्हणत अनेक नवे युवा चेहरे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तर जुने राजकीय ठेकेदार आपला विजय निश्चित करण्याच्या दृष्टीने अनेक खेळ्या करीत बोगस मतदार नोंदणी करून आपल्या वॉर्डात सोयीचे आणि खात्रीचे मतदार आणत आहेत. यासाठी अन्याय निवारण समितीने याविरोधात निवेदन देत अनेक मतदारांची दुबार झालेली नोंदणी, काही मतदारांची खोट्या पत्त्यावर इतर प्रभागात स्थानांतरित करण्यात आलेली नावे, नगरपंचायत हद्दीत प्रत्यक्ष वास्तव्यास नसलेले अनेक मतदार खोट्या पत्त्याचा आधार घेऊन यादीत समविष्ट करण्यात आली आहेत यापैकी काही व्यक्ती या परिसरातील ग्रामपंचायतीमधील सदस्य अथवा पदाधिकारी असल्याचेही आढळून आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वरील प्रकार अत्यंत गंभीर असून निवडणूकीचा निकाल व लोकशाही प्रक्रियेवर थेट परिणाम करणारा आहे त्यासाठी खोट्या पत्त्यावर नोंदणी असलेल्या सर्व मतदारांची चौकशी करून त्यांची नावे रद्द करावीत, दुबार नोंदी त्वरित वगळाव्यात आणि चोख, सत्य व अचूक मतदार यादी प्रकाशित केल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवू नये अन्यथा जनजागृती मोहीम, आंदोलन व उपोषणासारख्या लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी ), उपाध्यक्ष गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, विजय थोरवत, दिनकर जाधव, मदन तानवडे, जावेदभाई पठाण, संजय जोशी, मिनिन डिसोझा, संतोष बांदिवडेकर आदींच्या सह्या आहेत.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
You Tube लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

मुख्यसंपादक



