आजरा ( प्रतिनिधी ) – दिपावलीच्या मंगलमय वातावरणात श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, हरपवडे विभाग (आजरा) तर्फे आनंद, ऐक्य आणि आपुलकीचा सुंदर क्षण अनुभवायला मिळाला. या प्रसंगी धनगर समाजातील बांधवांसाठी विशेष फराळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता — समाजातील एकोपा वाढवणे, परस्पर स्नेह वृद्धिंगत करणे, आणि पारंपरिक सण उत्साहाने साजरा करणे. कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, आणि तरुण बांधवांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. सर्वांनी एकमेकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि गोड फराळाचा आस्वाद घेत सणाचा आनंद लुटला.
या उपक्रमात आदर्श हळवणकर, कुमार पाटील, प्रविण हळवणकर, अनिकेत लटम, जोतिबा पोवार, अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. समाजातील तरुणांनी हा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पाडला.उपस्थितांनी एकमुखाने व्यक्त केले —“एकत्र येऊ, समाजाला बळ देऊ, आणि परंपरेचा वारसा पुढे नेऊ!”
या सामाजिक उपक्रमामुळे धनगर समाजात आनंदाचे, एकोपा आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, सण साजरा करण्याची ही एक प्रेरणादायी पद्धत ठरली आहे.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
You Tube लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

मुख्यसंपादक


