डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या गडहिंग्लज तालुकाध्यक्षपदी नितीन मोरे तर उपाध्यक्ष अभिजीत मांगले,सचिव अमित कांबळे व खजिनदारपदी धनंजय शेटके यांची निवड करण्यात आली आहे.

सदरच्या निवडी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊसाहेब फास्के व उपाध्यक्ष दीपक मांगले मार्गदर्शनात करण्यात आल्या. नितीन मोरे यांना निवडीचे पत्र उपाध्यक्ष दीपक मांगले व गडहिंग्लज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या हस्ते देण्यात आले.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर सत्कारा नंतर नितीन मोरे म्हणाले की, तालुका संघटना बळकट करणे,पत्रकारांच्या विविध समस्या सोडविणे यासाठी आपण प्रयत्नशील राहू तसेच समाजातील विविध प्रकारच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संघटना कार्यरत राहील.

यावेळी आजरा तालुका अध्यक्ष संभाजी जाधव,चंदगड तालुका अध्यक्ष विजयकुमार कांबळे,आजरा उपाध्यक्ष अमित गुरव,गडहिंग्लज उपाध्यक्ष अभिजीत मांगले,सचिव अमित कांबळे,खजिनदार धनंजय शेटके, यांच्यासह गडहिंग्लज विभागातील पत्रकार बंधू उपस्थित होते

मुख्यसंपादक