Homeक्राईमबदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक मुख्यमंत्र्यांचे आदेश

बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक मुख्यमंत्र्यांचे आदेश

बदलापूर- बदलापूरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाने नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरले. रेल्वे ट्रॅकवर उतरत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता याप्रकरणी पोलिसांनी दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तसेच संस्था चालक, शिक्षकांचीही पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘मी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. या फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवला पाहिजे.

त्यामुळे पुन्हा यासारखं घाणरेडं कृत्य कोणी करणार नाही. मी संस्था चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात कोणालाही सोडता येणार नाही. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत’. दरम्यान पालकांना आवाहन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुमच्या मुली या माझ्या मुली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सरकार संवेदनशील असून कठोर कारवाई करू, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular