आजरा : (अमित गुरव) बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., एक्संबा (मल्टी स्टेट), शाखा- आजरा येथील बचत कर्जदार हिना फय्याज मुल्ला रा. आजरा यांचे आकस्मित निधन झाल्याने यांचे वारस रियाज आप्पा मदार (वडील ) यांना संस्थेकडून सदस्य कर्जदार मरणोत्तर निधीतून रु. ३०,०००/- इतके आर्थिक धनसहाय्य, शाखा चेअरमन श्री. ज्योतिप्रसाद सावंत याच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
निधी मंजूरीसाठी संस्थापक माजी खासदार श्री. अण्णासाहेब जोल्ले, सहसंस्थापिका माजी मंत्री आमदार सौ.शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी शाखेचे संचालक श्री.महेश कुरुणकर, श्री.अनिकेत शिंत्रे, श्री.सुशांत निकम, श्री सुनील डोणकर, श्री.सुरेश मिटके व सभासद, शाखा कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यसंपादक