Homeघडामोडीगोविंदा ना दहा लाखांचा विमा पण करावा लागणार अर्ज

गोविंदा ना दहा लाखांचा विमा पण करावा लागणार अर्ज

मुंबई- राज्य सरकारने दहीहंडी उत्सवापूर्वी गोविंदांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. गोविंदांसाठी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करण्यात आले असून दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे तयार करतांना एखादी दुर्घटना किंवा दुर्घटना घडल्यास किंवा जखमी झालेल्यांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार असल्याचं राज्याच्या क्रीडा विभागाने जाहीर केलं आहे. या साठी २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे. दहीहंडी असोसिएशनने (महाराष्ट्र राज्य) आक्षेप घेतलेला असतानाही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने राज्यातील सर्व गोविंदांचा विमा उतरविण्याची मोहीम सुरू केली आहे.

सरकारी आदेशानुसार हात किंवा दोन्ही डोळे गमावणाऱ्या गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे. राज्यातील ७५ हजार गोविंदांचा विमा उतरवण्याची घोषणा सरकारने केली आहे. दहीहंडीदरम्यान अपघातात गोविंदांचा एक हात, एक पाय किंवा डोळा गमावल्यास त्यांना ५ लाख तर दोन्ही हात, पाय किंवा डोळे गमावणाऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळणार असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. अपघातात जखमी झालेल्या गोविंदांना उपचारासाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये मिळू शकणार आहेत.

दहीहंडी असोसिएशनने (महाराष्ट्र राज्य) सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. असे असतांनाही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्यास सुरुवात केली आहे. या साठी गोविंदांना २४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आहे. विमा संरक्षणाचा कालावधी हा १४ ऑगस्टपासून ते २८ ऑगस्ट पर्यंत ६ वाजेपर्यंत राहणार आहे. अर्ज करतांना मंडळाचे विनंती पत्र, अर्ज व सर्व गोविंदांची नावे, वय व मोबाईल क्रमांक नमूद करून स्कॅन करून gi.mrdga@gmail.com या ई – मेल आयडीवर पाठवावे असे आवाहंन देखील महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने केले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular