आई आणि आजी
मातृदिनाच्या शुभेच्छा आई आणि आजी |
जिने मी जन्माला यायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम केलं.
जिने मला हे जग दाखवलं.
चालायला बोलायला शिकवलं.
संस्कारांची शिदोरी दिली.
प्रामाणिक पणे कष्ट करून यशस्वी होण्याचा मंत्र दिला.
माझा आत्मविश्वास वाढवला, धाडसी बनवले.
मी चुकीचे वागल्यावर शिक्षा दिली.
आणि चांगलं काम केल्यावर कौतुकही केलं.
जेव्हा जेव्हा मला अपयश आले तेव्हा तेव्हा मला धीर दिला प्रोत्साहन दिले.
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
माझं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी खुप कष्ट घेतलं.
मला कधी कशाची कमी पडू दिली नाही.
जिच देवाकडे फक्त एकच मागणं माझ्या मुलांचं सगळं चांगले होऊ दे.
ती व्यक्ती म्हणजे माझी आई.

आई
जीवनातील सर्वात मोठे सुख आहे ती.
माझे स्वर्गही आहे ती.
हे जग दाखवणारी पण ती.
जगण्याच कारण ही ती.
आमच्यासाठी लढणारी पण ती.
आम्हाला लढायला शिकवणारी पण ती.
चुकलं तर रागवणारी पण ती.
आणि रुसणारी पण ती.
आम्हाला समजणारी पण ती.
चुक होऊ नये म्हणून समजवणारी पण ती.
एकटे चालणं शिकवणारी पण ती.
पण प्रत्येक क्षणाला पाठीशी असनारीही ती.
प्रेमळ, आम्हाला लाडवणारी अशी ती.
शब्दांत वर्णन सामावणार नाही अशी ती

आजी
मी तुझ्यासोबत माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ घालवला आहे,
तू खूप गोड आहेस एवढेच मी म्हणू शकते,
आई पेक्षा जास्त प्रेम करणारी आशी ती आजी
माझ्या आयुष्यात तुझी महत्वाची भूमिका आहे,
तुझ्यासारखी सुंदर आजी हवी,
धन्यवाद, आजी, मी तुझ्यावर खूप प्रेम करते ,
तू नेहमी माझ्या विचारात असतेस !
