आजरा – (अमित गुरव) -: रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेत मराठी भाषा वापरने गरजेचे असताना सुद्धा काही ठिकाणी त्यांचा वापर होत नाही असे निदर्शनास आले आहे.
इथून पुढे बँकेचे व्यवहार पैसे भरणे , काढणे , कर्जाचे करार हे मराठी मध्येच असले पाहिजेत. येत्या आठ दिवसांत यावर अंमलबजावणी झाली नाही तर मनसे स्टाईल ने खळखट्याक केले जाईल असा इशारा आजरा मनसे च्या वतीने देण्यात आला आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले , तालुका अध्यक्ष आनंदा घंटे , ॲड. सुशांत पोवार, वसंत घाटगे , विनायक घंटे , सरिता सावंत , सुनील पाटील, मयुर हरळकर , यांच्या सह्या आहेत.

मुख्यसंपादक