Homeघडामोडीआजरा पाणी पुरवठा योजनेची चौकशी

आजरा पाणी पुरवठा योजनेची चौकशी

आजरा – ( अमित गुरव ) -: आजरा शहर अंतर्गत घरगुती पाणी पुरवठा योजनेमधील कामाची तातडीची नमुना दर्जा पाहणी करणे व इतर चालू कामाबाबत चौकशी चे आदेश प्रांताधिकारी गारगोटी यांनी नगरपालिकेला दिले आहेत.

     आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने आजरा नळपाणी योजना बाबत  तसेच आजरा रहिवासी लोकांच्या अन्यायाविरोधात अनेक दिवसापासून पाठपुरावा करत होते. त्यातील एक नळपाणी योजनेच्या संदर्भात चौकशी करण्यात यावी असे निवेदन मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , जलसंधारण मंत्री , जिल्हाधिकारी , व प्रांताधिकारी , यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत प्रांताधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे मुख्याधिकारी यांना आदेश देत या कामाचा दर्जा तसेच इतर कामाची तपासणी करावी आणि आपल्या स्तरावर अन्याय निवारण समितीला माहिती कळवून कार्यवाही चा अहवाल प्रांतकार्यालयात सादर करण्यात यावा अशे आदेश देण्यात आले आहेत.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular