आजरा (हसन तकीलदार ):-अंजुमन इत्तेहादुल इस्लामचे प्रेसिडेंट हाजी आलमभाई नाईकवाडे यांनी अंजुमन संचलित डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुलच्या इमारतीची दुरुस्ती करून घेत असताना वरिष्ठ विद्यालयाबरोबरच वस्तीगृह सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
आजरा येथील डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुल इमारतीचे छत अगदी जीर्ण झाले होते. पावसाळ्यात गळत्या होत होत्या त्यामुळे पावसाचे पाणी शाळेत गळत होते. त्याचप्रमाणे कौले फुटली होती आणि छताचे लाकूड कुजून छत कमकुवत झाले होते. त्यामुळे छप्पर पडून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता होती. याचा सारासार विचार करून प्रेसिडेंट नाईकवाडे यांनी कोणताही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने स्वतः आर्थिक जुळवा जुळव करून कौलाचे छप्पर काढून याठिकाणी स्लॅब टाकण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी नाईकवाडे म्हणाले की, पाचवी ते बारावी पर्यंत शंभर टक्के अनुदानावर शाळा कॉलेज सुरु आहे. परंतु पुढील शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी शासनाकडे पाच एकर जमिनीचा प्रस्ताव पाठवून याठिकाणी आय टी, सायन्स विभाग, वसतिगृह, तसेच वरिष्ठ विद्यालय सुरु करण्याचा मानस आहे. युवा पिढी शिकली तरच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होणार आहे. त्यासाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण देणार. यासाठी समाजाची साथ हवी. पालक मंत्री आबिटकर आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेणार आणि त्यांचे सहकार्य घेणार. या अगोदर शाळेत पाण्यासाठी कुपनलिका खोदली आहे. परिसरात शोभिवंत रोपे लावली आहेत. फरशी पॉलिश, शाळेची रंगरंगोटी, प्रसाधनगृहे दुरुस्ती अशी कामे करून घेतली आहेत. आमच्या पूर्वजांचे शाळेसाठी जे स्वप्न होते ते स्वप्न साकार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. महिला सशक्तिकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी शिवण क्लासेस सुरु करून महिलांना आत्मनिर्भर करणार. त्याचपद्धतीने शाळेत तक्रार पेटीसुद्धा लावली आहे. एकंदरीत शाळेत आदर्शवत कामे सुरु केली आहेत. शैक्षणिक अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्याचे ध्येय समोर ठेऊन कार्य सुरु आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, बूट सॉक्स त्याचप्रमाणे बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना मोफत वाहनाची सोय सुरु केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रियाज तकीलदार, असलम आगलावे, अब्दुलमजीद लमतुरे, शरीफ खेडेकर, सिलेमान दरवाजकर, जब्बार तकीलदार, अबुलास दरवाजकर, प्र. मुख्याध्यापक सलीम शेख आदिजण उपस्थित होते.

मुख्यसंपादक