Homeमहिलापावसाळ्यात स्काल्पमध्ये वाढली खाज, तर वापरा हे तेल आणि करा सोप्या पद्धतीने...

पावसाळ्यात स्काल्पमध्ये वाढली खाज, तर वापरा हे तेल आणि करा सोप्या पद्धतीने केसांवर उपयोग | If the scalp is itchy during monsoons, use this oil and use it on hair in a simple way |

पावसाळ्यात स्काल्पमध्ये वाढली खाज, तर वापरा हे तेल :

पावसाळ्यात स्काल्पमध्ये वाढली खाज, तर वापरा हे तेल आणि करा सोप्या पद्धतीने केसांवर उपयोग | केसांसाठी जोजोबा ऑईल अत्यंत फायदेशीर आहे. केसांसाठी जोजोबा ऑईल कसे फायदेशीर ठरते याबाबत ही महत्त्वाची माहिती. पावसाळ्यात केसांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
Jojoba Oil For Hair: पावसाळ्यात केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. केसांमध्ये येणारी खाज, रॅसेस, कोरडेपणा यामुळे स्काल्पही खराब होते. नैसर्गिक उपायांनी तुम्ही स्काल्प आणि केसांची काळजी घेऊ शकता. या नैसर्गिक उपायांमध्ये जोजोबा ऑईल महत्त्वाचे ठरते.

जोजोबा ऑईल हे केसांचे सौंदर्य वाढविण्यास मदत करते यासह स्काल्पमध्ये येणारी खाज कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. वास्तविक Jojoba Oil चे अनेक उपयोग आहेत. केसांमध्ये संक्रमण, बॅक्टेरियल त्रास होत असेल तर WebMD ने केलेल्या अभ्यासानुसार, जोजोबा ऑईल केसांमधील खाज थांबवून केसांची वाढ होण्यास फायदेशीर ठरते.

पावसाळ्यात स्काल्पमध्ये वाढली खाज
पावसाळ्यात स्काल्पमध्ये वाढली खाज

स्काल्पची सूज कमी करण्यासाठी


जोजोबा ऑईलमध्ये सूज रोखण्याचे गुण असून केसांच्या स्काल्पची सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये असणारे ओमेगा – ६ फॅटी अ‍ॅसिड उपयुक्त ठरते. तसंच यासह विटामिन ई चे देखील हे उत्तम स्रोत असून स्काल्पची सूज कमी होण्यास यामुळे मदत मिळते. स्काल्पमध्ये येणारी खाज आणि रॅश यामुळे थांबण्यास मदत मिळते.

स्काल्प हायड्रेट करण्यासाठी


पावसाळ्यात केस अधिक कोरडे होऊ लागतात. त्यामुळे केसांमध्ये अधिक खाजही येऊ लागते. तसंच पावसात भिजल्यामुळे केस अधिक खराब होतात. अशा परिस्थितीत जोजोबा ऑईल हे तुमच्या केसांसाठी उत्तम ठरते. हे तेल केसांना लावल्यामुळे सीबम संतुलित होते आणि त्यामुळे स्काल्प मॉईस्चराईज राहण्यास मदत मिळते. तसंच केस अधिक काळ हायड्रेट राहण्यास फायदा होतो.

केसांच्या वाढीसाठी मदत


काही अभ्यासात सांगितल्यानुसार, जोजोबा ऑईल केसांची वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरते. तसंच जोजोबा ऑईल मेहंदी आणि लवेंडरसारख्या अन्य एसेन्शियल ऑईलसह मिक्स करून केसांची अधिक वाढ होण्यास मदत मिळते. यामुळे केस अधिक लांब, घनदाट आणि अधिक सुंदर होण्यास फायदा होतो.


पावसाळ्यात स्काल्पमध्ये वाढली खाज
पावसाळ्यात स्काल्पमध्ये वाढली खाज

कोंडा कमी करण्यासाठी


जेव्हा स्काल्प इन्फेक्शनबाबत सांगितले जाते, तेव्हा कोंडा होणे अत्यंत कॉमन आहे. तुम्हालाही कोंड्याचा त्रास होत असेल तर जोजोबा ऑईलचा वापर करून घ्या. जोजोबा ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीव्हायरल गुण असतात, जे स्काल्पवरील संक्रमणाशी लढण्यास अधिक योग्य ठरते.

कसे वापरावे जोजोबा ऑईल


How To Use Jojoba Oil: केसांमध्ये जोजोबा ऑईल वापरण्यासाठी सर्वात पहिले जोजोबा ऑईल आधी कोमट करून घ्या. त्यानंतर हे तेल स्काल्पवर हलक्या हाताने लावा आणि मसाज करा. तुम्हाला हवं असल्यास, नारळाचे तेल अथवा ऑलिव्ह तेल यामध्ये मिक्स करून घ्या. या तेलाने मसाज केल्यानंतर साधारण २-३ तास तसंच ठेवा आणि नंतर केस माईल्ड शँपूने धुवा. यामुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

अधिक माहिती

संदर्भ

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular