Homeघडामोडीलाचेची मागणी झाल्यास फक्त एक कॉल करा - एसीबी उपअधीक्षक वैष्णवी पाटील

लाचेची मागणी झाल्यास फक्त एक कॉल करा – एसीबी उपअधीक्षक वैष्णवी पाटील

कोल्हापूर -: कोल्हापूर जिल्हयातील कोणत्याही शासकीय कार्यालयात कामानिमित्त गेल्यानंतर जर तुमच्या कडे कोणी लाचेची मागणी केली किंवा तुमचे काम थांबवले वेळेत पूर्ण केले नाही तर त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात एका कॉल वर करावी तुमच्या तक्रारीची दखल घेत सापळा रचून संबधित अधिकारी दोषी आढळल्यास लगेच अटक करण्यात येईल असे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी मंगळवारी कोल्हापूरचा पदभार स्वीकारल्यानंतर आवाहन केले.

  • कोण आहेत वैष्णवी पाटील

  • पाटील ह्या मूळच्या कांदे तालुका शिराळा जिल्हा सांगली येथील रहिवासी असून त्यांनी पोलीस अधीक्षक असताना जुना राजवाडा येथे सेवेला प्रारंभ केला. सरदार नाळे यांची बदली झाल्याने वैष्णवी पाटील यांनी कोल्हापूरचा पदभार स्वीकारला त्यांना जिल्हा तील अनेक ठिकाणी काम केल्यामुळे केल्याचा अभ्यास आहे.
  • महसूल विभागात लाचेची मागणी होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांनची पिळवणूक होते मात्र तक्रार कोठे करायची माहिती नसल्याने न्याय मिळेल काय असे नानाविध प्रश्न पडतात. त्यामुळे जनजागृती करणार . आठवडी बाजार टोल फ्री नंबर मोबाईल नंबर असे फलक शासकीय कार्यालयात लावले जातील तक्रारदारांना एसीबीच्या कार्यालयात न येता केवळ फोनच्या माध्यमातून तक्रार करता येईल.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular