आजरा- (प्रतिनिधी ) -: बुडत्या जहाजात बसण्यास अर्थ नाही. विकास कामासोबत राहिले पाहिजेत. आजरा मडिलगे येथील मुंबई, पुणे ग्रामस्थ यांची गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आलेल्या ग्रामस्थांचा मेळावा गुरुवार दि. १२ रोजी संपन्न झाला. यावेळी मेळाव्यात संबोधित करताना हनुमान समुह अध्यक्ष के. व्ही.येसने बोलत होते. स्वागत ग्रामपंचायत सदस्य सुशांत गुरव यांनी केले. तर प्रस्ताविक माजी उपसभापती दीपक देसाई यांनी केले. पुढे बोलताना श्री येसने म्हणाले नाम. हसन मुश्रीफ हे विकास कामे व सर्वसामान्य जनतेचा विकास करणारे एक व्यक्तिमत्व आहे. यांनाच आपण विजयी करणे काळाची गरज आहे. कागल विधानसभा मतदार संघाचा विकास व्हायचा असेल तर मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी राहणं गरजेचे आहे. यामुळे बुडत्या जहाजात बसण्यात काही अर्थ नाही.. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने, व ग्रामस्थांनी आपल्या गावच्या व मतदार संघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले. यावेळी बोलताना माजी सभापती भिकाजी गुरव म्हणाले. यापूर्वीच्या आमदार हसन मुश्रीफ यांच्या विजयात आपला वाटा आहेच. परंतु होऊ घातलेल्या विधानसभेत आपण त्यांना पुन्हा प्रचंड मताने विजय करून पाठवण्यासाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे आपण नाम. मुश्रीफ यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा निश्चय या ठिकाणी करु व विकास कामे करणाऱ्या योग्य उमेदवाराशी आपण पाठीशी राहूया असे बोलताना श्री गुरव म्हणाले.
प्रास्ताविक करताना माजी उप. सभापती श्री देसाई म्हणाले आजपर्यंत अंदाजे चारशे कोटी इतका निधी ना. हसन मुश्रीफ यांच्या निधीतून मडिलगे गावांसाठी आणला व विकासकामे केली आहेत. तर वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून व वैद्यकीय, वैयक्तीक, कामे ग्रामस्थ यांची केली आहेत. पुढील काळात यापेक्षा अधिक निधी या गावासाठी आणून गावचा विकास करायचा आहे यासाठी नाम. मुश्रीफ साहेब यांच्या पाठीशी राहणे हे कर्म प्राप्त आहे. यामुळे आपण सर्व पुणे मुंबई ग्रामस्थ यांनी नेहमीच आम्हाला साथ दिला आहात यापुढेही अशीच साथ असेल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत. व मागील मताधिक्यापेक्षा त्यापेक्षा अधिक मताधिक्याने आपण पुन्हा एकदा ना. मुश्रीफ यांना विधानसभेत पाठवण्यासाठी पाठीशी राहूया असे बोलताना श्री देसाई म्हणाले. सरपंच बापू निऊगरे म्हणाले ग्रामपंचायत च्या माध्यमातून केलेल्या विकास कामाचा आढावा देत. आपण ना. मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी राहुन विकास कामे करूया गावचा विकास साधुया असे म्हणाले.
यावेळी गणपतराव पाटील, माजी सरपंच गणपतराव आरळगुंडकर, पांडुरंग वझरेकर, उप. सरपंच पांडुरंग जाधव सह भावेश्वरी समूहाचे, हनुमान समुहाचे प्रमुख पदाधिकारी, मुंबई, पुणे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश कडगावकर यांनी आभार मानले..
मुख्यसंपादक