Homeघडामोडीस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यामुळे मानसिंग खोराटे यांची ताकद वाढली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यामुळे मानसिंग खोराटे यांची ताकद वाढली

चंदगड ( अमित गुरव) -: मानसिंग खोराटे यांनी बंद पडणारा दौलत कारखाना चांगला चालवला यात आम्हा चंदगड तालुक्यातील लोकांना तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे पर्यटन आणि चंदगड विकास करणारा उमेदवार मिळाला आहे त्यांना आम्ही साथ देऊ पण भविष्यात जर काही नकारात्मक गोष्टी घडल्या तर आंदोलन करण्यासाठी सुद्धा आम्ही मागेपुढे पाहणार नाही. असे माजी सभापती जगन्नाथ हुलजी म्हणाले.
मी राजकारणात का आलो आणि कशासाठी या प्रश्नावर मानसिंग खोराटे यांनी कारण सांगताना मला समाजसेवा आणि चंदगडचा विकास करायचा आहे , विकास काय असतो हे सर्वांना दाखवून द्यायचे आहे असे उत्तर दिले.
खोराटे यांचे नाव आणि काम चांगले आहे त्यांनी बंद पडलेला दौलत पुन्हा सुरू करून आमच्या शेतकरी बांधवांना उन्नतीचा मार्ग दाखवण्यासाठी प्रयत्न केले असे मत सतीश सबनीस यांचे झाले. त्यासाठी आम्ही त्यांना आमदार करण्यासाठी अहोरात्र झडू
चंदगड सोबतच आजरा , गडहिंग्लज येथील ही कारखाने चालवले तर खोराटे यांना आमदार होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही. त्यासाठी प्रचार करण्याची गरज भासणार नाही असे सुरेश कुटरे बोलले.

या शेतकरी मेळाव्यात संतोष मळवीकर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत करताना सत्यवादी माणसाच्या पाठीमागे उभा असल्याचे मला समाधान आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात बाळाराम फडके , शिवाजी कांबळे, मधुकर पाटील , राजू देवळी, हनुमंत सावंत , पिंटू गुरव , धोंडीबा चौगुले, सचिन पाटील, सावंत , अशोक लोहार , प्रकाश कांबळे , पांडुरंग पाटील , तसेच चंदगड तालुक्यातील अनेक गावामधून शेतकरी वर्ग अपस्थित होता. त्यांनी मानसिंग खोराटे तुम आगे हम तुम्हारे साथ है क्या घोषणांनी परिसर दनानुन सोडला.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular