1 Lakh Rs Salary: जर लहान मुलांना सांभाळण्याची आवड असेल तर तुम्ही सुद्धा लाखो रुपयांची कमाई करू शकता असा सल्ला या महिलेनं जगभरातील महिलांना दिला आहे.
opportunities for women
गेल्या काही काळात बेरोजगारीचा स्थर कमालिचा वाढला आहे. त्यात आता AI तंत्रज्ञान आल्यामुळे अनुभवी लोकांच्या नोकऱ्या सुद्धा धोक्यात आल्या आहेत. परिणामी उच्च शिक्षण असताना अनेक जण बेरोजगार होऊन घरी बसलेले दिसतायेत. पण समस्येवर एका महिलेने भन्नाट मार्ग शोधून काढलाय. तिनं चक्क लहान मुलांना सांभाळण्याचा व्यवसाय सुरू केलाय. आता तुम्ही म्हणाल मग यात काय विशेष? पण लक्षवेधी बाब म्हणजे ही महिला केवळ श्रीमंत लोकांच्या मुलांचाच सांभाळ करते. अन् तुम्हाला वाटून आश्चर्य वाटेल पण ती दिवसाला तब्बल १ लाख रुपये कमावतेय. इतका पैसा तर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये CEO म्हणून काम करणाऱ्या अनुभवी लोकांना सुद्धा मिळत नसेल. त्यामुळे तुम्हाला जर लहान मुलांना सांभाळण्याची आवड असेल तर तुम्ही सुद्धा लाखो रुपयांची कमाई करू शकता असा सल्ला या महिलेनं जगभरातील महिलांना दिला आहे.
आहे कोण ही महिला?
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या या महिलेचं नाव ग्लोरिया रिचर्ड असं आहे. ती श्रीमंत मुलांची नॅनी म्हणून काम करते. या कामासाठी तिला दिवसाला २ हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजे जवळपास १.६ लाख रुपये मिळतात. बरं, लाखो रुपयांच्या पगारासोबतच तिला लग्झरी गाड्यांमधून फिरायला मिळतं. आलिशान विमानांमधून वेगवेगळे देश फिरता येतात. विविध प्रकारचं महागडे पदार्थ खायला मिळतात. त्या श्रीमंत मुलांना सर्व सोयी सुविधा ग्लोरियाला अनुभवता येतात. पण ही नोकरी करणं दिसतं तितकं सोपं नाही.
नोकरीची सुवर्ण संधी
पण ही नोकरी करणं दिसतं तितकं सोपं नाही. कारण ग्लोरिया Neurodivergent मुलांचा सांभाळ करते. म्हणजे अशी मुलं ती मानसिकरित्या कमकूवत आहेत. या मुलांचा अभ्यास घेणं, त्यांना नव्या गोष्टी शिकवणं, त्यांना खाऊ-पिऊ घालणं अन् सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांच्या ताब्यात देईपर्यंत त्यांना सुरक्षित ठेवणं अशी सर्व कामं ग्लोरियाला करावी लागतात. ग्लोरिया दिवसाला किमान १० मुलांचा सांभाळ करते. प्रत्येक मुल हे वेगळ्या प्रवृत्तीचं असतं. काही मुलं फारच रागीट असतात तर काही फारच खोडकर अशा सर्व मुलांना सांभाळताना काही वेळेस जीव मेटाकूटीला येतो. पण ग्लोरिया गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत आहे. ती म्हणते की या क्षेत्रात एखाद्याला करिअर करायचं असेल खूप संधी आहे. कारण जगभरात असे अनेक पालक आहेत ज्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत, पण मुलांना द्यायला वेळ नाही. अशा मुलांचा सांभाळ करून तुम्ही त्यांची मदतही करू शकता अन् चांगले पैसे देखील मिळवू शकता.