प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन होणार प्रवासी व कामगाराच्या समस्या , तक्रारी व सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निपटारा होण्यासाठी येत्या सोमवार पासुन आगरणीहाय प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत संबधित विभागाचे विभाग नियंत्रण वेळापत्रकानुसार एका आगारात जाऊन सकाळी 10 ते 2 या सत्रामध्ये प्रवाशांच्या लेखी तक्रारी आणि त्यावर काय उपाय योजना करता येतील यांचे आदेश देतील. त्याचप्रमाणे 3 ते 5 या वेळेत S T कर्मचाऱ्याच्या वयक्तिक व संघटनात्मक समस्या ऐकून घेतील व योग्य ती कार्यवाही करतील.
सर्व प्रवासी व कर्मचारी यांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या तक्रारी , सूचना लेखी स्वरूपात ज्या दिवशी उपरोक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा विभाग नियंत्रक यांच्या कडे द्याव्यात.
आगर निहाय वेळापत्रक
15/7/2024 सकाळी 10 ते 2 प्रवासी राजा दिन , दुपारी 3 ते 5 कामगार पालक दिन गडहिंग्लज आगार येथे होणार .
19/7/2024 सकाळी 10 ते 2 प्रवासी राजा दिन , दुपारी 3 ते 5 कामगार पालक दिन कोल्हापूर आगार येथे होणार .
22/7/2024 सकाळी 10 ते 2 प्रवासी राजा दिन , दुपारी 3 ते 5 कामगार पालक दिन संभाजीनगर आगार येथे होणार .
26/7/2024 सकाळी 10 ते 2 प्रवासी राजा दिन , दुपारी 3 ते 5 कामगार पालक दिन चंदगड आगार येथे होणार .
29/7/2024 सकाळी 10 ते 2 प्रवासी राजा दिन , दुपारी 3 ते 5 कामगार पालक दिन इचलकरंजी आगार येथे होणार .

मुख्यसंपादक