आजरा(हसन तकीलदार)..येथील व्यंकटराव प्राथमिक, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरामध्ये “रक्षाबंधन” हा सण सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षक- शिक्षिका यांचे समवेत समारंभ पूर्वक उत्साहात संपन्न झाला..
प्रशालेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी रंगीत लोकर धागा वापरून सुंदर गोंड्यांच्या राख्या तयार केल्या होत्या व बहिण- भावा मधील अतूट प्रेमाच्या नात्याचा हा गोड सण साजरा करताना विद्यार्थिनींनी व प्रशालेतील सर्व शिक्षिका यांनी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी , प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर तसेच सर्व शिक्षक बंधू व इयत्ता पहिली ते दहावी सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधून साखरपेढे भरवून तोंड गोड करण्यात आले.
प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार यांनी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भाऊ बहिणीच्या गोड नात्याबद्दल तसेच आजच्या या विज्ञान युगात आपली संस्कृती जतन करून ठेवत असताना जुन्या चालीरीती ,रूढी, परंपरा, सणसमारंभ सुरू करण्यामागे आपल्या पूर्वजांचा असणारा वैज्ञानिक दृष्टिकोनासह उद्देश आपल्या मनोगतातून सविस्तर कथन केला.
अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची या आनंदमय सोहळ्यास उपस्थिती यामुळे कार्यक्रम आणखीनच उत्साहवर्धक झाला. प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर मोठ्या रांगोळीची प्रतिकृती तयार करताना स्वतः सर्व विद्यार्थी या आकारात उभे राहून एक सुंदर मोठ्या राखीच्या कलाकृतीची निर्मिती केली.ही प्रतिकृती अगदी मनमोहक होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. एस. डी.इलगे यांनी केले, सूत्रसंचालन सौ. पाटील ए.डी. व आभार प्रदर्शन श्रीमती एन.ए.मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक आर.व्ही. देसाई, सर्व स्टाफ तसेच व्यंकटराव हायस्कूलचा सर्व स्टाफ उपस्थित होता.
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



